aandolan aandolan
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको'

यावेळी उपस्थित नागरिकांनी अर्धातास रस्ता रोखो आंदोलन करुन महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली होती

शेख मुनाफ

आडुळ (औरंगाबाद): स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण (obc political reservation) अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करावे व ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यासाठी आडुळ सर्कल मधील ओबीसी समाजाच्या वतीने शनिवारी (ता.२६) रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता.पैठण) येथे रस्ता रोको करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी अर्धातास रस्ता रोखो आंदोलन करुन महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली होती.

वाहतुक बंद झाल्याने दोन्ही बाजूंने जवळपास एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात सहभागी नागरीकांनी राजकीय क्षेत्रात असलेले आरक्षण पुर्वीप्रमाणेच ठेवावे अशी मागणी करीत घोषणाबाजी करुन आपल्या मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार संतोष अनर्थे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांना दिले.

याप्रसंगी भास्कर गीते, नवनाथ सांगळे, विक्रम जायभाय, सोपान थोरे, सतीश राख, रमेश गोर्डे, संजय दौंड, बप्पासाहेब दौंड, भगवान खाडे, बाळासाहेब गिते, उध्दव गिते, कृष्णा गिते, रामलाल कोठुळे, ज्ञानेश्वर वाघ, मुजीब शेख, रामनाथ डिघुळे, दत्तु दौंड, महादेव भिसे, भरत ढाकणे, सूर्यभान गिते, सुरेश धोञे, रामदास ठाकणे, राजु सांगळे, मंडळ अधिकारी भारती मादनकर, अक्तर पठाण,चाँद पठाण यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, महामार्ग पोलीस आलमगीर शेख यांनी बंदोबस्त ठेवला होता.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.

- नवनाथ सांगळे

आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होणार असुन स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण जशाच तसे ठेवण्यात यावे.

-विक्रम जायभाये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

Alibag Beach Tar Balls : पर्यटकांच्या आवडत्या अलिबाग बीचवर डांबराचे थर; तेलगळती की जहाजांचा कचरा? 'टार बॉल्स'मुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील पळशी शिवारात शेततळ्यात पडून सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

"२७ कोटींचा दबाव नाही, तर..." रिषभ पंतच्या खराब फॉर्मवर कोच जस्टीन लँगर यांचं मोठं विधान; म्हणाले कॅप्टन केल अन्..

Kolhapur Cafe Illegal Raid : ‘कॅफे’त वाढदिवसाचा नावाखाली नाजूक विषयांना पाठबळ; कोल्हापुरात कॅफेत चटई, उशी, सोफासेट पाहून पोलिसही अचंबीत

SCROLL FOR NEXT