परराज्यांतील भाडेकरूंची माहिती
पोलिस ठाण्यात देणे आवश्यक
-----
बीड, ता. १९ (बातमीदार) : शहरासह तालुक्यात रोजगार, व्यवसाय आणि मजुरीनिमित्ताने परराज्यातील अनेक कामगार, नागरिक येऊन भाडेतत्त्वावर राहतात. मात्र, हे नागरिक कामाच्या स्वरूपानुसार अल्प कालावधीसाठी वास्तव्य करून अचानक गावाकडे परत जात असल्याने त्यांच्या वास्तव्याची अद्ययावत नोंद घरमालकांकडे असणे आवश्यक आहे.
परराज्यातून येणारे मजूर व नागरिक जिल्ह्यातील विविध भागांत घरे भाड्याने घेऊन राहत आहेत. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरू घरात राहण्यासाठी येण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घेऊन संबंधित पोलिस ठाण्यास देणे आवश्यक असल्याचे बीड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. भाडेकरू केव्हा आला, किती दिवस राहणार आहे, तसेच तो घर सोडून गेल्यानंतर त्याची माहितीही घरमालकांनी अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
-----
पडताळणी करणे सुलभ
भाडेकरूची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र किंवा उपलब्ध अन्य ओळख व पत्त्याचा पुरावा घ्यावा. तसेच कायमचा पत्ता, मोबाइल क्रमांक, कामाचे ठिकाण, नोकरी अथवा व्यवसायाची माहिती आदी तपशील व्यवस्थित नोंदवून ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या Tenant/Temporary Resident फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून ती पोलिसांना देण्याची कार्यवाही घरमालकांनी करावी. परराज्यातील नागरिकांच्या वास्तव्याची योग्य नोंद राहिल्यास पोलिसांना कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक पडताळणी करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरू ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेऊन त्याची माहिती पोलिस प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------
((कोट))
शहर पोलिस ठाणे हद्दीतील इतर राज्यामधील कामगार, नागरिक जे घर भाड्याने घेऊन राहतात, अशा नागरिकांची घरमालकांनी पोलिस ठाण्यामध्ये त्यांचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओळखपत्र जमा करावे. त्यामुळे इतर राज्यातील नागरिकांची पोलिस ठाण्याला नोंद होईल.
- नवनीत कॉवत, पोलिस अधीक्षक, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.