घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस कर्मचारी.
घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस कर्मचारी. Sakal
छत्रपती संभाजीनगर

चापानेर शिवारात दरोडा; दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

चापानेर - चापानेर (ता. कन्नड) कन्नड-वैजापूर राज्य महामार्गावर चापानेरपासून जवळच असलेल्या पावसे शेतवस्तीवर (गट क्र. २६६) येथे बुधवारी (ता. १३) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने शेतकरी कुटुंबास मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दीड ते दोन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कन्नड-वैजापूर महामार्गालगत चापानेर शिवारात (गट क्र.२६६) शेतवस्तीवर उमाकांत जयराम पावसे (वय ३५) हे कुटुंबासह राहतात. बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाच जणांनी पावसे यांच्यावर लोखंडी रॉड व काठीने हल्ला केला. या उमाकांत व त्यांची भावजय तेजस्विनी हे गंभीर जखमी झाले. तसेच पत्नी सुनीता व दोन मुले यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत, कानातील सोन्याच्या रिंगा, पायातील जोडवे काढून घेतले आणि चाकूचा धाक दाखवून आवाज केला तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली. तोपर्यंत सोबत असलेल्या दोन चोरट्यांनी घरात घुसून घरातील सामान अस्ताव्यस्त करून समोर असलेल्या रॅकवरील डबे उचकटून एका तांदळाच्या डब्यात ठेवलेली रोख रक्कम हाती लागल्याने ती रक्कम घेऊन ते घराच्या बाहेर आले. त्यानंतर इतर साथीदारांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना घरात कोंडून बाहेरून दरवाजा बंद करीत पसार झाले. दरम्यान, उमाकांत पावसे व भावजय तेजस्विनी पावसे यांना जबर मारहाण झाल्याने त्यांना कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि.तात्याराव भालेराव, उपनिरिक्षक एस. राजपूत, बिट जमादार गणेश जैन, बाबासाहेब धनुरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव यांनी भेट दिली. यावेळी श्वान पथकाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्य रस्त्यापर्यंत माघ काढला. परंतु तिथून चोरटे वाहनात बसून पसार झाल्याची शक्यता आहे.

शेतकरी उमाकांत पावसे यांनी दिलेल्या माहिती वरून त्यांचे रोख पंचावन्न हजार व एक ते दीड लाख रुपयाचे सोने असे एकूण दीड ते दोन लाखाचा ऐवज चोरी गेला आहे. या घटनेमुळे चापानेरसह परिसरातील शेतवस्तीवरील राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण आहे.

उसने आणलेल्या पैशावर डल्ला

मंगळवारी दुपारीच उमाकांत पावसे यांनी आपल्या साडूकडून वाळूची गाडी येणार असल्याने वाळू खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये उसने आणले होते. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने सदर शेतकरी अडचणीत सापडला आहे.

जवळच्या शेतात सापडला मोबाईल

चोरट्यांनी उमाकांत पावसे यांचा मोबाईल जवळच असलेल्या उत्तम पांडुरंग पवार(गट क्र.२५०) यांच्या शेतात फेकून दिला होता. हा मोबाईल ट्रेस केल्यामुळे शेतात फेकून दिल्याचे निदर्शनास आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT