छत्रपती संभाजीनगर

रोहयोच्या वैयक्तिक योजनांसाठी आता केवळ चार कागदपत्रे; स्टॅम्प, नोटरीची अट रद्द

CD
रोहयोच्या वैयक्तिक योजनांसाठी स्टॅम्प-नोटरीची अट रद्द शेतकऱ्यांचा ५०० रुपयांपर्यंतचा खर्च वाचणार; मालदांडी, दगडी वाणांच्या चारा लागवडीलाही मंजुरी कळंब, ता. १३ (बातमीदार) : रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी होणारा अनावश्यक खर्च आणि वेळ आता कमी होणार आहे. वैयक्तिक योजनांचे प्रस्ताव सादर करताना स्टॅम्प आणि नोटरीची अट वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कळंब तालुकास्तरीय बैठकीत घेण्यात आला. यापुढे सातबारा, आठ-अ सह केवळ चार आवश्यक कागदपत्रांवर प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. तसेच चारा लागवडीसाठी स्थानिक मालदांडी व दगडी वाणांना परवानगी देण्याची मागणीही मान्य करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती प्रा. राजश्री वरपे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्हीबी-जी-रामजी (VB-G-RAMG) अंतर्गत रोजगार हमी योजनेतील कामांचे नियोजन करण्यासाठी ४ नोव्हेंबरला तालुकास्तरीय बैठक घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, तहसीलदार हेमंत ढोकळे आणि गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. प्रा. वरपे यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांना स्टॅम्प व नोटरीसाठी सुमारे ५०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हा अनावश्यक खर्च वाचविण्यासाठी स्टॅम्प व नोटरीची अट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत चार आवश्यक कागदपत्रांवर प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अनंत लंगडे यांनी रोहयोअंतर्गत वैयक्तिक अनुदानातून चारा लागवडीसाठी स्थानिक मालदांडी व दगडी वाणांना परवानगी देण्याची मागणी केली. ती मान्य झाल्याने स्थानिक वाणांच्या चारा लागवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उपजिल्हाधिकारी धरमकर यांनी प्रत्येक गावात ‘सेल्फ’वरील कामे मंजूर करून ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच रोजगार हमी योजनेचा कृती आराखडा गावपातळीवर तातडीने तयार करून कामांचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ पाटील, पंचायत समितीच्या उपसभापती प्रणिता चव्हाण, सदस्य रामचंद्र सांगळे, नामदेव जाधव, संध्या खुणे यांच्यासह तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, तलाठी आणि विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT