‘रोहित पठारे हत्या प्रकरणी आरोपींना फाशी द्या’
बीड, ता.१३: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील रोहित पठारे याच्या हत्येतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण वाघमारे यांनी दिला.
वैजापूर येथील या हत्याकांडामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने जिल्हा गुरुवारी (दि. १२) बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनातून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासह पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. तसेच अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण वाघमारे, जिल्हा महासचिव दिलीप माने, नितीन मुजमुले, जिल्हा संघटक ॲड. राजेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अनुरथ वीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.