woman suicide
woman suicide sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : झरी येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

बाजार सावंगी : झरी (ता.खुलताबाद) येथील विवाहित महिलेने मंगळवारी (ता.११) सकाळीच सातच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पदमाबाई सुभाष चंदवडे (वय ५०) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सदर महिलेचा जावई बाळू ऊर्फ सुनील बाबूलाल बारवाल (ह.मु.जरी) मसाल्याचे पदार्थ आणण्यासाठी जायचे असल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी सासू पदमाबाई यांना आवाज दिला. मात्र, घरातून आवाजाला प्रतिसाद मिळाला नाही.

तेव्हा त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता सासूने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी सरपंच करण राजपूत यांना कळविल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी त्यांना खाली उतरून प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार सावंगी येथे उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

पंचनामा मुख्य जमादार नवनाथ कोल्हे, जमादार संजय सपकाळ दिलीप बनसोड, संतोष पुंड यांनी केला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम. एम. चोपडे यांनी शवविच्छेदन केले. मृत महिलेच्या पश्चात पती, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

सदर महिलेने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT