अतिक्रमण हटाव sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : कॅनॉटमध्ये चार हॉटेल टार्गेट

प्रशासकांनी केली तासभर पाहणी; कारवाईचे दिले निर्देश

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सिडको भागात शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. ही मोहीम अंतिम टप्प्यात असताना प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी रात्री अचानक कॅनॉट प्लेस भागात पाहणी केली.

यावेळी त्यांनी चार हॉटेलला टार्गेट केले. याठिकाणी असलेले फ्लेक्स तीन दिवसात काढून घ्या, अन्यथा महापालिकेतर्फे कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. चौधरी यांनी दिला. हॉटेल चालकांना इशारा देताना प्रशासकांनी इतर अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्याचा सूर व्यापाऱ्यांनी आळवला.

सिडको भागातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुसार प्रशासक डॉ. चौधरी यांनी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यासोबत पाहणी केली.

पाहणी दरम्यान त्यांनी हॉटेल राणा, हॉटेल मराठा, हॉटेल व्हीआयपी मराठा, हॉटेल शिवमुद्रा यांना हॉटेलच्या भिंतीवर लावलेले फ्लेक्स काढून घ्या, अन्यथा महापालिका कारवाई करेल, असा इशारा दिला. याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना अनधिकृत पार्किंग होऊ नये याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना प्रशासकांनी केली. यावेळी पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सिडकोचे उपअभियंता उदय चौधरी, वॉर्डअधिकारी प्रसाद देशपांडे, वॉर्ड अभियंता राजेंद्र वाघमारे, इमारत निरीक्षक पंडित गवळी यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT