sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : लम्पी’चा जोर वाढल्याने जनावरांचा बाजार बंद

वडोद बाजारमध्ये अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.

नवनाथ इधाटे पाटील

फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह फुलंब्री तालुक्यातही लम्पी स्कीन रोगाचा शिरकाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दर सोमवारी वडोद बाजार येथे भरणारा जनावरांचा आठवडी बाजार बंद करावा, या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला होता. यानुसार वडोद बाजार ग्रामपंचायतीने सोमवारी जनावरांचा भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली.

तालुक्यातील वडोद बाजार येथे दर सोमवारी गाय, बैल, म्हैस, घोडा या जनावरांचा मोठा आठवडी बाजार भरतो. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु, मागील काही दिवसांपासून लम्पी रोगाने डोकेवर काढल्यामुळे जनावरांत या रोगाचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वडोद बाजार येथील आठवडी बाजार बंद ठेवावा, म्हणून ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला होता. यामुळे बाजार येथे सोमवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. पण, बाजार बंदची माहिती अनेकांना नसल्याने त्यांना आल्या पावली पुन्हा माघारी जावे लागले.

किरकोळ बाजार सुरू

तालुक्यातील वडोद बाजार येथे दर सोमवारी भरविण्यात येणारा गाय, बैल, म्हैस, घोडा यांचा बाजार भरण्यात आला नाही. परंतु, शेळी, मेंढी, बाजार भाजीपाला व इतर किरकोळ बाजार नियमितपणे सुरू होता. त्यामुळे जनावरे खरेदी विक्रीसाठी आणलेल्या व्यापारी व शेतकऱ्यांना आल्या पावली आपली जनावरे पुन्हा वापस घेऊन जावे लागले.

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार वडोद बाजार येथील गाय, म्हैस, बैल आणि घोडा या जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आपापल्या जनावरांना लम्पीचे लसीकरण करून घ्यावे.

डॉ. गोपाळ वाघ, उपसरपंच, वडोद बाजार

जनावरांचे लसीकरण करून घ्यावे

फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी जनावरांना फऱ्या व ‘लम्पी’पासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे व ग्रामपंचायतला सहकार्य करावे, असे आवाहन वडोद बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT