bhaskar pere patil sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : शिक्षक, किर्तनकारांमुळे समाज चुकीच्या दिशेला गेला ; भास्करराव पेरे पाटील

पेरे पाटलांची घसरली जीभ

सकाळ वृत्तसेवा

किल्लारी : मला गुरुजींचा राग आहे. शिकलेल्यांनी स्वार्थासाठी समाज बिघडवला. शाळेतला शिक्षक, आमदार, खासदार, कीर्तनकारांनी समाज बिघडवल्याचे सांगताना पाटोदा (ता. गंगापूर) येथील माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची जीभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला.

रोटरी सॅटॅलाइट क्लबतर्फे सोमवारी (ता.२७) झालेल्या कार्यक्रात पेरे पाटील बोलत होते. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अशोक गावकरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद बिराजदार, सूरज बाबळसुरे, मुख्याध्यापक सतीश भोसलेंसह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. पेरे पाटील म्हणाले; समाजामध्ये शिक्षक हा आदर्श मानला जातो. समाजाला काही द्यायची गरज नसून त्यांना सुशिक्षित करण्याची गरज आहे.

समाज हा देवासारखा आहे. शिक्षकांसह, खासदार, आमदार, कीर्तनकारांनी स्वार्थासाठी समाजाला चुकीचे सांगितले. त्यामुळे समाज चुकीच्या दिशेने गेला. तो सुधारला पाहिजे, यासाठी गावाने पंचसूत्रीचा उपयोग करावा. पिण्याचे स्वच्छ पाणी, ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, शिक्षण, वृद्धांना सांभाळणे या गोष्टी कराव्यात. हे सांगताना त्यांची आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.

लोकांकडून कर घेऊन सुविधा द्या. फुकट काही देऊ नका. किल्लारीची लोकसंख्या तीस हजार असेल तर गावामध्ये एक लाख वीस हजार झाडे असले पाहिजेत. ती फळांचे असावीत. आईच्या दुधाविना मूल जगते मात्र ऑक्सिजनविना ते जिवंत राहू शकत नाही. झाडे लावण्यासाठी, स्वच्छतागृहासाठी शासन पैसा देते. या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

शिक्षक हा समाजाचा आदर्श आहे. त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवरून बोलणे म्हणजे राजकारण करणे होय.

- प्रकाश सुभेदार, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी जिल्हा शिक्षक संघटना, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT