sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : बायोमायनिंग कचऱ्याचा करणार ‘खेळ खल्लास

नारेगावसह १० लाख मेट्रीक टनावर होणार प्रक्रिया ,वर्षात महापालिकेची ६५ एकर जागा होणार रिकामी

माधव इतबारे

नारेगाव - येथील जुना कचरा डेपो व शहर परिसरातील चार कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर तब्बल १० लाख मेट्रीक टन कचरा साचला असून, या कचऱ्यावर आता बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला ६६ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रक्रियेने वर्षभरातच कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच प्रक्रिया झाल्यानंतर महापालिकेची सुमारे ६५ एकर जागा रिकामी होणार आहे.

कचऱ्यामुळे नारेगाव, मांडकीसह १० ते १५ गावातील ग्रामस्थ त्रस्त होते. वारंवार विनंती, आंदोलने केल्यानंतरही महापालिका येथील कचरा डेपो हटवत नसल्याने २०१६ मध्ये ग्रामस्थांनी महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या.

दोन ते तीन महिने कचऱ्याविरोधात आंदोलन सुरू होते. त्यामुळे शेवटी राज्य शासनाने हस्तक्षेप करत महापालिकेचा चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा १४८ कोटींचा डीपीआर मंजूर केला. असे असले तरी या चार प्रक्रिया केंद्रांवर नंतरच्या काळात शेकडो टन कचरा साठलेला आहे. नारेगाव येथे देखील कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत.

या कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी निधी मिळावा म्हणून, महापालिकेने प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार राज्य शासनाने ६६ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले,

की नारेगावसह हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात सुमारे १० लाख मेट्रीक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यावर बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. वर्षभरात हा संपूर्ण कचरा संपणार आहे. त्यामुळे सध्या कचऱ्याच्या ढिगामुळे वापरात नसलेल्या पाच ठिकाणच्या जागा महापालिकेला वापरात येतील. ही जागा ६५ एकर असल्याचे जाधव यांनी सांगितले.

बायोमायनिंग म्हणजे काय?

प्रक्रिया करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जातो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती तर सुक्या कचऱ्यातील प्रक्रिया होऊ शकणारे पदार्थ वेगळे केले जातात.

अशा आहेत जागा

नारेगाव ५४ एकर

पडेगाव ७ एकर

चिकलठाणा १.५ एकर

कांचनवाडी २.५ एकर

हर्सूल- २० गुंठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT