छत्रपती संभाजीनगर शहर  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : स्वच्छतेसंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहर देशात एक नंबरचे करण्यासाठी आता इंदूर पॅटर्न

घनकचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे इंदूर शहर देशात चर्चेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छतेसंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहर देशात एक नंबरचे करण्यासाठी आता इंदूर पॅटर्न राबविला जाणार आहे. महापालिकेच्या सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांना घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात किमान दोन तास काम करावे लागेल, असा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता. १६) सांगितले. प्रत्येक अधिकारी व स्वच्छतेच्या कामावरील कर्मचारी यांच्यात संपर्क राहावा, यासाठी सहाशे वॉकीटॉकी खरेदी केले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

घनकचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे इंदूर शहर देशात चर्चेत आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून स्वच्छता निरीक्षकापर्यंत काम करणाऱ्या सुमारे तीस जणांची टीम इंदूरला पाठवली होती. या टीमने इंदूर शहराचे घनकचरा व्यवस्थापन कसे आहे, याचा अभ्यास केला.

याविषयी जी. श्रीकांत म्हणाले, की इंदूरच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा प्रत्येक अधिकारी आता स्वच्छतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरेल. या अधिकाऱ्यांनी किमान दोन तास शहर स्वच्छतेच्या कामासाठी दिले पाहिजेत असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना तीनशे ते चारशे घरे वाटून दिली जाणार आहेत.

अधिकारी व स्वच्छतेच्या कामावरील कर्मचारी यांच्यात संपर्क आणि समन्वय राहावा यासाठी सहाशे वॉकीटॉकी खरेदी केले जाणार आहेत.

या वॉकीटॉकीचा आपत्कालीन व्यवस्थापनासाठी देखील वापर होईल. तसेच कचऱ्याच्या वर्गवारी संदर्भात काही निर्णय घेतले जातील. आत्तापर्यंत सलून वेस्ट घंटागाडीमध्येच टाकला जातो. ही गंभीर बाब आहे. सलून वेस्ट हे बायोमेडिकल वेस्ट म्हणून गृहीत धरले जाणार आहे. यासाठी सलून असोसिएशनसोबत चर्चा करण्यात येईल. त्यात त्यांना समजून सांगून स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करणार

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात लवकरच स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे. तसेच जनजागरण मोहीम देखील राबवली जाईल. नागरिकांना महापालिकेकडून काय सुविधा अपेक्षीत आहेत, याची विचारणा केली जाईल. त्यानुसार सुविधेत बदल केले जातील. दुकानदार कचरा रस्त्यावर टाकतात त्यांना रस्त्यावर कचरा न टाकण्याबद्दल प्रथम समजून सांगितले जाईल, त्यानंतर दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल असे जी. श्रीकांत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT