शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : स्वत:ला वाचवण्यासाठीच खासदार इम्तियाज मंदिरात!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील हे राममंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, ही चुकीची माहिती आहे. रामनवमीच्या आदल्या रात्री ११ वाजता दोन गटांतील तरुणांमध्ये परस्पर वाद, घोषणाबाजी झाली. तो वाद तेव्हाच मिटला. रात्री दीडनंतर आपसातील दोन गटांतील लोकांमुळे किराडपुऱ्यात दंगल झाली. त्यामुळे याला हिंदू-मुस्लिम दंगल म्हणता येणार नाही. तसेच, खासदार जलील हे राममंदिर वाचवायला नव्हे, तर जमावापासून स्वत:ला वाचवायला गेले होते, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केला.

सकल हिंदू एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (ता.४) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदींची उपस्थिती होती.

श्री. जंजाळ म्हणाले, की जिवाची बाजी लावत दंगल थोपवणाऱ्या पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांचे अभिनंदन करतो. त्यात श्रीमती गीते जखमी झाल्या, महिला अधिकाऱ्यांवर हात उचलणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करतो. मागे राजाबाजार, आता किराडपुरा दंगलीतही पोलिसच टार्गेट केले.

दंगेखोरांनी पोलिस वाहन सुरू करुन एक्सीलेटरवर दगड ठेवला. त्यानंतर डिझेलच्या टाकीचे झाकण उघडून वाहन पेटवून दिले. आम्हाला पोलिसांच्या कामावर शंका नाही. पण, खासदार म्हणताहेत की, हिंदूंवर गुन्हे दाखल करा. तिथे हिंदू नव्हतेच. त्यामुळे जलील पोलिसांवर दबाव आणत आहेत.’

‘खासदार जलील यांना त्यांचाच जमाव दगड मारायला लागला, म्हणून ते राममंदिर परिसरातील पोलिस चौकीत पळाले. तसेच राममंदिर पोलिसांनी वाचवले, जलील यांनी नाही.’ दंगलीदरम्यान खासदार जलील यांच्यासोबत झालेल्या चर्चेवरही श्री. जंजाळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘तुम्ही मंदिरात काय करताय? तिथे काय झालंय?’ हे मी विचारले तर, ते म्हणाले, ‘मंदिराला धक्का नाही. मात्र बाहेर दंगल सुरूय.’

श्री. खांबेकर म्हणाले, की पोलिस कारवाईनंतर लक्षात येते, की ही राजकीय लोकांनी घडवलेली दंगल आहे. दंगलीतील ‘पीएफआय’चा संबंध स्पष्ट करा. रोजचे अपडेट पोलिस आयुक्त यांनी द्यावेत.

श्री. पाटील यांनी नाव न घेता, खासदार जलील यांच्यावर आरोप केला. पाटील म्हणाले, ‘मंदिरात आश्रय घेण्यासाठी ते आले होते का? जलीलांनी आधी आवाहन केले, नंतर आव आणला. पहाटे पावणेचारपर्यंत त्यांचे ११ व्हिडिओ पडले, तोपर्यंत मी राममंदिर वाचवतो, असे जलील का म्हणाले नाहीत?’. दरम्यान, श्री. दांडगे यांनी दंगलखोरांवर कडक कारवाईची मागणी केली.

अतिक्रमण काढले अन् दंगल झाली

मागच्यावेळी अतिक्रमण काढले होते, तेव्हाही राजाबाजार-शहागंज येथे दंगल झाली होती. आताही अतिक्रमण मोहीम सुरु झाली तर, किराडपुरा येथे दंगल झाली. याबाबीही पोलिसांनी तपासून पहाव्यात. तसेच दंगलखोरांना आवरण्यासाठी पोलिसांच्या ‘वज्र’द्वारे रंग वापरायची गरज होती. सोबत पोलिस बंदोबस्त वाढवणे, आधुनिक यंत्रणा वापरणे, एसआरपीएफ तुकड्या कायमस्वरुपी देण्याची मागणी यावेळी श्री. जंजाळ यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT