आंदोलन
आंदोलन sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : आंदोलनात शिक्षक संघटना आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जुनी पेन्शन योजना राबविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने ती लागू करण्याबाबत सरकारने अभ्यास समिती स्थापन केली आहे. यासाठी वेळ देण्यास शिक्षक संघाने तयारी देत या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.

परंतु, याचे पडसाद बुधवारी (ता.१५) जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर बघावयास मिळाले. शिक्षक संघाच्या भूमिकेबद्दल अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी टीका केली. यावरून दोन शिक्षक संघटना काहीवेळ आमनेसामने आल्या होत्या.

यावर शिक्षक सेनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे यांनी शिक्षक संघाच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेत त्यांची माघार चुकीची असल्याचे स्पष्ट केले. यादरम्यान शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी आक्षेप घेत व्यक्तिगत टीकाटिप्पणी न करण्याची विनंती केली. दरम्यान चर्चा सुरू असतानाच दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने येत वाद झाला.

आंदोलनाला वेगळेच वळण येत असल्याचे निदर्शनास येताच शिक्षक भारतीचे सुभाष महेर, बिजू मारग, कर्मचारी महासंघाचे प्रदीप राठोड, मध्यवर्ती संघटनेचे संजय महाळंकर, आदर्श शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे यांनी मध्यस्थांची भूमिका बजावली. समज-गैरसमज दूर झाल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आंदोलन सुरू असताना कोणत्याही एका नेत्याबद्दल टीका करणे उचित नव्हते. परंतु टीका झाली, यामुळे किरकोळ वाद झाला. यात जिल्हा शिक्षक संघाच्यावतीने आंदोलनातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शिक्षकांची भावना लक्षात घेता मागण्या पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी संपात सहभागी राहणार आहेत.

-राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ.

शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजी थोरात यांनी या संपातून माघार घेतली, यामुळे राज्यात त्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे, असे असले तरीही जिल्ह्यातील शिक्षक संघाचे जिल्ह्यातील पदाधिकारी संपात सहभागी आहेत. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेतून संपात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, यामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणती तरी एक भूमिका स्वीकारावी.

-महेश लबडे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख, शिक्षक सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT