माठ sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : उन्हाळ्यातील पावसाचा हंगामी व्यवसायांना दणका

माठ, रांजणाची विक्री थंडावली, रसवंतीमध्ये तुरळक ग्राहक

सकाळ वृत्तसेवा

केदारखेडा : फेब्रुवारीच्या अखेरपासून साधारणपणे उन्हाळ्याची चाहूल लागते. त्यानंतर मग माठ, रांजणाच्या विक्रीला सुरुवात होते, शिवाय रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी रसवंती थाटल्या जातात. मात्र यंदा मार्च महिन्यापासून ढगाळ वातावरण, बेमोसमी पावसाची हजेरी सुरू आहे. परिणामी उन्हाळ्यातील पावसाचा हंगामी व्यवसायांना दणका बसला आहे.

उन्हाळा लागताच घरोघरी थंड पाणी पिण्यासाठी गरिबाचे फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांची मागणी सुरू होते. शिवाय अनेकजण रांजणही विकत घेतात. मात्र मार्च महिन्यात उन्हाळ्यासारखी स्थिती नव्हती. सतत ढगाळ वातावरण, बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे माठ आणि रांजणाची फारशी विक्री झालेली नाही.

परिणामी कुंभार कारागिरांकडे अजूनही माठ, रांजण पडून आहेत. एप्रिल महिन्यात व्यवसाय जोमात असतो. यंदा मात्र एप्रिल महिन्याचा अर्धा कालावधी लोटलेला आहे, पण विक्री नाही. आता पुढील केवळ दीड महिन्यात माठ, रांजण विक्रीचा थोडाफार व्यवसाय करण्यास वाव आहे.

मात्र सतत वातावरण बदलत असल्याने कुंभार कारागीरही चिंताग्रस्त झाले आहेत. यापुर्वीही कोरोना काळात दोन वर्ष व्यवसायाला फटका बसलेला होता. आता वातावरण बदलाने विक्री मंदावल्याने यंदा व्यवसाय डबघाईला आला असल्याचे कारागीर अनिल तेटवार , सुनील तेटवार यांनी सांगितले.

परिसरात महामार्गालगत रसवंती शीतपेयाची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. मार्च महिन्यापासून रसवंतीवर ग्राहकांची मोठी गर्दी असते. यावर्षी मात्र ढगाळ वातावरण, बेमोसमी पावसामुळे उन्हाचा तडाखा जाणवलेला नाही. परिणामी गेल्या दीड महिन्यापासून रसवंतीवर तुरळक ग्राहक येत आहेत, असे गणेश बनकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT