Sambhajinagar Summer News
Sambhajinagar Summer News  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Summer News : मराठवाड्यात उन्हाचा चटका

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला, की सोशल मीडियावर एक मेसेज हमखास फिरतो. उन्हाची तीव्रता खूपच वाढलेली असते. सर्वसामान्य घरातील, रोजीरोटीसाठी रोज घराबाहेर पडणे भाग असलेला एक नागरिक या उन्हाने तापलेला असतो. ऊन आणि उकाडा असह्य झाल्याने शेवटी वैतागून सूर्याला उद्देशून त्याच्या तोंडून उद्‍गार निघतात, ‘‘बा सूर्या, आता घरात येतोस की काय..?’’

अशीच प्रातिनिधिक भावना मराठवाडा अन् छत्रपती संभाजीनगर शहरवासीयांनी व्यक्त केली असेल! त्याला कारणही तसेच आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तापमान गुरुवारी नोंदले गेले. दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शहरात गेल्या मंगळवार, बुधवारी ४०.५ अंश तापमान होते. त्यात एकाच दिवसात जवळपास दोन अंशांनी वाढ झाली.

कमाल तापमानासोबत किमान तापमानातही वाढ झाली असून, ते २६ अंशांवर गेले आहे. त्यामुळे रात्रही उष्ण आहे. उन्हाच्या चटक्यांचा जनजीवनावर परिमाण झाला असून, भरदुपारी बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी अनेक जण सायंकाळनंतर घराबाहेर पडत आहेत.

रात्रही उष्ण...

वाढत्या तापमानामुळे मराठावाडा तापला असून, सहा शहरांचे तापमान गुरुवारी चाळिशीपारच होते. विशेष म्हणजे किमान तापमानही वाढत असून, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूरच्या उदगीरध्ये रात्रही उष्ण आहे. त्यामुळे या शहरांत रात्रीचा उकाडा त्रस्त करीत आहे. मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल होत असून, ठिकठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. असे असले तरी सूर्यही तळपता आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होत आहे. भाजून काढणारे ऊन आणि रात्रीच्या प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

शहरनिहाय तापमान (कमाल व किमान, अंशांमध्ये)

  • छत्रपती संभाजीनगर ४२.२ २६.०

  • बीड ४१.६ २२.०

  • नांदेड ४१.४ २८.०

  • हिंगोली ४१.५ २३.०

  • धाराशिव ४१.२ २६.०

  • जालना ४०.८ २३.०

  • परभणी ३९.२ २०.९

  • उदगीर ३९.० २५.०

  • (सोर्स : आयएमडी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT