Light Shower In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरातील काही भागांत रिमझिम पाऊस

ई सकाळ टीम

औरंगाबाद : सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद शहरातील पैठण गेट, औरंगपूरा, क्रांती चौक, खोकडपूरा या भागात सोमवारी (ता.१४) दुपारी दोनच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वातावरणात गारवा आहे. त्यामुळे औरंगाबादकर बाहेर पडताना कानटोपी, स्वेटर यासह इतर ऊबदार कपडे घालून दैनंदिन कामे करताना दिसत आहेत. पैठण गेट, सेव्हन हिल या भागातील स्वेटर विक्रेत्यांकडून ऊबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी झालेली आहे.

रविवारीही (ता.१३) शहरातील काही भागात हलकासा पाऊस पडला होता. तसेच जिल्ह्यातील येसगाव, दिघी परिसरात जोरदार पाऊस झाला. आज सोमवारी पिशोर व परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या बदललेल्या वातावरणाचा रब्बी पिकांना फटका  बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. तापमानाचा पारा खाली आल्याने व सूर्यदर्शन नसल्याने वातावरणात गारवा आहे. चापानेरसह परिसरात सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरण असून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे.

संपादन - गणेश पिटेकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT