छत्रपती संभाजीनगर

शाकुंतल स्कूलमध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश

CD
शाकुंतल स्कूलमध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’चा संदेश नांदेड, ता. ४ (बातमीदार) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये गुरुवारी (ता. २) स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. ‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून शाळेच्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसरातील कचरा संकलित केला. तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष गिरीश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग झाली पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य सदाशिव टाकळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छ परिसर, स्वच्छ विचार आणि जबाबदार नागरिकत्व यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी उपाध्यक्ष दीपक जाधव, सचिव सिंधू पावडे, कोषाध्यक्ष पूजा जाधव, सहसचिव शिवकुमार बुक्के, उपप्राचार्य बार्शीकर, समन्वयक श्रीनिवास बिरादार, शिल्पा यमेकर, प्रीती भारती यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine War : रशियाचा भारतीय कंपनीच्या औषध प्रकल्पावर ड्रोन हल्ला; एकाचा मृत्यू, मोठे नुकसान

माढ्यात आढळला दीडशे वर्षे 'लुप्त' मानल्या गेलेल्या प्रजातीतील जीव; ३६० अंशात पाहणारा 'इंद्रधनुष्य कोळी' शोधला!

Delhi News: जंतर-मंतरवर आंदोलनात खळबळजनक घटना! पोलिसांकडून महिला पत्रकाराचा लैंगिक छळ

Latest Marathi News Live Update : आम्ही काही 'व्होट बँक' नाही आणि आम्हाला आमचे हक्क मिळालेच पाहिजेत: असदुद्दीन ओवेसी

Stone Crusher: मलठणमध्ये स्टोन क्रशरच्या ब्लास्टिंगचा फटका; शेतजमिनींसह हजारो फळझाडांचे नुकसान

SCROLL FOR NEXT