अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी टिम ई सकाळ
छत्रपती संभाजीनगर

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी

आरोपीने लग्न न करताच बळजबरी शारिरीक संबंध ठेवल्याने मुलीने औरंगाबादला जाण्याचा आग्रह धरला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी सतीश भाऊसाहेब मैंद (वय २३ रा. राहूलनगर) यास अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी भादंवि कलम ३६३ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद व कलम ३७६ (२)ख अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरी व कलम ४ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

देवळाई चौकातील एका शाळेत दहावीत शिकणारी मुलगी पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर सुटल्यावर सर्व मुली घरी आल्या मात्र, एक मुलगी रिक्षातून घरी आलीच नाही. कुटूंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र, मुलगी कुठेच मिळाली नाही. तिचे देवळाई चौकातून अपहरण झाले म्हणून नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

१४ मार्च २०१८ रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी तपास केला असता ती गल्लीतीलच सतीश मैंद सोबत मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने लग्न न करताच बळजबरी शारिरीक संबंध ठेवल्याने मुलीने औरंगाबादला जाण्याचा आग्रह धरला.

शेवटी दोघेही स्वत:हून सातारा पोलिस ठाण्यात हजर झाले. आरोपीने अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. आरोपी विरोधात सातारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३,३६६(अ), ३७६, पोस्को कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुशिला खरात यांनी तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून रज्जाक शेख यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT