Shripal Sabnis
Shripal Sabnis 
छत्रपती संभाजीनगर

खऱ्या हिंदूंना मोदी-शहांच्या खोट्या हिंदूंपासून धोका -श्रीपाल सबनीस

प्रकाश बनकर

औरंगाबाद : ""सहिष्णू देशामध्ये हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. आज खऱ्या हिंदूंना मोदी-शहा यांच्या खोट्या हिंदूंचा धोका आहे,'' असे वक्‍तव्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि मुस्लिम मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने डॉ. इक्‍बाल मिन्ने लिखित "मी टेकले नाहीत हात अजून' या कवितासंग्रहावर आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षपदावरून प्राचार्य सबनीस बोलत होते. सरस्वती भुवन महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा. डॉ. कैलास अंभुरे, देवगिरी महाविद्यालय मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. समिता जाधव, प्रा. शेख अरिफ ताजुद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. 

तेढ निर्माण करणाऱ्यांचे मनसुभे 

श्री. सबनीस म्हणाले, ""हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या वल्गना करून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, हे देशहिताला बाधा पोचविणारे आहे. तेढ निर्माण करणाऱ्यांचे मनसुभे समाजाने ओळखले पाहिजेत, कोणताही धर्म हिंसा शिकवीत नाही; परंतु राजकारणी मंडळी धर्मा-धर्मात, समाजा-समाजात तेढ कसे निर्माण होईल, अशीच कारस्थाने रचित आहेत,'' असा आरोपही त्यांनी केला.

हा कवितासंग्रह हुंकार

यावेळी डॉ. इक्‍बाल मिन्ने यांच्या कवितासंग्रहाचा उल्लेख करीत डॉ. सबनीस म्हणाले, ""भयाच्या दहशतीतून अनुभवयास आलेल्या वेदनेचा हा कवितासंग्रह हुंकार आहे,'' असेही त्यांनी नमूद केले. यावेळी या कवितासंग्रहावर प्रा. डॉ. शेख, डॉ. जाधव, प्रा. डॉ. अंभुरे आणि डॉ. कांबळे यांनी परखड भाष्य केले. डॉ. मिन्ने यांनी प्रास्ताविक केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT