छत्रपती संभाजीनगर

सिद्धेश्वर धरणाचे पाच दरवाजे उघडणार

CD
सिद्धेश्वर धरणाचे पाच दरवाजे उघडणार पूर्णा नदीपात्रात २५०० क्युसेक पाणी सोडणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १३ : परभणी आणि पूर्णा शहरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सिद्धेश्वर धरणाच्या वक्रद्वारातून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १४) सकाळी १०.३० ला धरणाचे पाच वक्रद्वार प्रत्येकी ३० सेंटीमीटरने (सुमारे एक फूट) उघडून नदीपात्रात २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यासंदर्भात पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. परभणी महापालिका आणि पूर्णा नगर परिषद यांच्या मागणीनुसार पूर्णा नदीवरील रहाटी व पूर्णा कोल्हापुरी बंधाऱ्यामधून अनुक्रमे एक टीएमसी आणि अर्धा टीएमसी पाणी सोडून परभणी व पूर्णा शहरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. धरणाचे पाच दरवाजे उघडल्यानंतर पूर्णा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही तांत्रिक अडचणी उद्‍भवल्यास पाणी सोडण्याच्या नियोजनात ऐनवेळी अंशतः बदल होऊ शकतो, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नदीपात्रातील पाणीपातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच वाहने किंवा जनावरे नदीपात्रात सोडू नयेत. नदीपात्रात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, यासाठी संबंधित गावांमध्ये सावधानतेचा इशारा देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

Latest Marathi News Live Update: उदापूर येथे सुपर कॅरी गाडीची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

India Export: भारताच्या निर्यातीत 30 टक्क्यांची मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये 8.47 लाख कोटींची निर्यात, व्यापार तुटीतही घट

'आग ये सुंदरा...तुझा माझा गो शोभल जोडा' आगरी कोळी गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT