file photo 
छत्रपती संभाजीनगर

ग्रामपंचायतीला १५ दिवसांपासून टाळे, संतप्त ग्रामस्थाने फोडले कुलूप

वैभव पाटील

नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रांची आवश्यकता होती. ते मिळावेत, यासाठी श्री. ढोरमारे हे दहा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे चकरा मारत होते.

नायगाव (जि.उस्मानाबाद) : नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी नायगाव (ता.कळंब) (Kalamb) येथील एका तरुणाला ग्रामपंचायतीकडून (Gram Panchayat) काही कागदपत्रांची आवश्यकता होती. पण, पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद होते. त्यामुळे रुजू होण्याची मुदत टळून जाण्याची भीती आहे. परिणामी, त्या तरुणाच्या संतप्त वडिलाने दगडाने ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप रविवारी (ता.३०) फोडले. ग्रामपंचायत सदस्यांतील (Osmanabad) आपसातील वादामुळे पंधरा दिवसांपासून कार्यालय बंद होते. याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागला. येथील गोविंद ढोरमारे यांच्या मुलाची भारतीय सेना दलामध्ये निवड झाली. त्याला नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रांची आवश्यकता होती. ते मिळावेत, यासाठी श्री. ढोरमारे हे दहा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे चकरा मारत होते. परंतु, कार्यालय बंद असल्याने त्यांना ते कागदपत्र मिळू शकले नाहीत. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप दगडाने फोडणे आणि घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसले. (Since 15 Days Naigaon Gram Panchayat Not Open Its Office Lock)

मृताच्या कुटुंबीयांचीही कोंडी

कोरोनामुळे (Corona) कुणाचा मृत्यू झाला आणि त्याच्यावर कोविडच्या नियमानुसार गावात अंत्यसंस्कार करायचे झाले तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र लागते. मात्र, ग्रामपंचायत कार्यालय बंद आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागल्याची घटनाही या काळात घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT