jalna sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalna Crime :जालन्यात भरदिवसा व्यापाऱ्याचे सहा लाख पळविले

जालन्यात भरदिवसा थरार : दुचाकीने आलेले भामटे सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरातील भोकरदन नाका-जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावर शुक्रवारी (ता.२९) भरदिवसा दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी व्यापाऱ्याची सहा लाख रूपये ठेवलेली पैशांची बॅग लंपास केली. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात पुन्हा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या तीन भामटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके स्थापन केली आहेत.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापारी अभय छाजेड यांचे बालाजी एजन्सी नावाने किराणा दुकाना आहे. त्यांचा मुलगा जय छाजेड हे शुक्रवारी (ता.२९) सकाळी साडेदहा वाजता कामगार पवन रामा सावरे यांच्यासोबत स्कुटीवरून भोकरदन नाका ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावरून किराणा दुकानावर निघाले होते. त्यांच्याकडे सहा लाखांची रोकड होती. पिशवीत असलेल्या या पैशांसोबतच तीन डायऱ्या, एक चेकबुक होते.

ही पिशवी स्कुटीवर कामगार पवन सावरे याने त्याच्या पायाजवळ पुढे ठेकली होती. याच मार्गावरील वरकड हॉस्पिटलच्या पुढील श्रीराम टाइल्स ॲण्ड स्टोन्स या दुकानाजवळ ते आल्यानंतर त्याच्या पाठीमागून दुचाकीवर ट्रीपलसीट तीन भामटे आले. स्कुटीवरील पैशांची पिशवी एका भामट्याने हिसकावून घेतली आणि तिघांनी पळ काढला.

जय छाजेड यांनी या भामट्यांचा पाठलाग केला. मात्र, हे तीन भामटे राजूर चौफुलीकडे पळून गेले. माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह पथकातील अधिकारी, कर्मचारी देखील घटनास्थळी आले. या प्रकरणी जय छाजेड यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भागात सतत बॅग लिफ्टींगचे प्रकार

भोकरदन नाका ते जालना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावरील वरकड हॉस्पिटल पार केल्यानंतर सुनसान मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर यापूर्वी देखील बॅग लिफ्टींचे प्रकार घडले आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील पोलिस चौकीची मागणीही यापूर्वी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात गृह विभागासह पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

सीसीटीव्हींची तपासणी सुरू

या तीन भामट्यांच्या शोधासाठी पोलिस प्रशासनाने चार पथके स्थापन केली आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेसह चंदनझिरा पोलिसांच्या पथकाचा समावेश आहे. पोलिसांनी चोरांनी पळ काढलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजी तपासणी सुरू केली असून तीन भामटे दुचाकीवरून पळ काढताना पोलिसांनी दिसून आले आहेत. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT