छत्रपती संभाजीनगर

अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर फायनान्स कंपनीकडून सील

CD
अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर फायनान्स कंपनीकडून सील --------------- लातूर, ता. १५ : कर्जाचे हप्ते थकल्याने तालुक्यातील ममदापूर येथील अल्पभूदारक शेतकरी नवनाथ बोयणे यांचे घर फायनान्स कंपनीकडून सील करण्यात आल्याची घटना समोर आली. घर सील केल्याने बोयणे कुटुंबाला घराबाहेर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या घटनेची प्रशासन दखल कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व अन्य कर्जदारांना दिलेल्या कर्जाची वसुली करताना स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स व इतर खासगी वित्तीय संस्थांनी कोणत्याही प्रकारची सक्ती करणे, कर्जवसुलीसाठी मानसिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, धमकी किंवा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नये. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेत. राज्य सरकारनेही याबाबत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. अशा स्थितीत ममदापूर येथील अल्पभूदारक शेतकरी बोयणे यांचे घर फायनान्स कंपनीकडून सील केल्याची घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली असली, तरी संबंधीत शेतकरी कुटुंबाला घराबाहेर रहावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

SCROLL FOR NEXT