Electric Bus  sakal
छत्रपती संभाजीनगर

Electric Bus : ई-बसची तीन महिने प्रतीक्षा ; उपकेंद्र उभारण्यासाठी लागणार वेळ

स्मार्ट सिटीच्या ताफ्यात ३५ ई-बसची भर पडणार आहे. पण, त्यासाठी आणखी तीन महिने तरी वाट पाहावी लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : स्मार्ट सिटीच्या ताफ्यात ३५ ई-बसची भर पडणार आहे. पण, त्यासाठी आणखी तीन महिने तरी वाट पाहावी लागणार आहे. जाधववाडी भागात उभारण्यात येणाऱ्या बसच्या डेपोमध्ये इ-बस चार्जिंगसाठी विजेची हायटेन्शन लाईन टाकणे आणि उपकेंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी अभियानामार्फत शहर बससेवा सुरु आहे. त्यासाठी शंभर बस खरेदी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान शासनाने शहराचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीने हैदराबाद येथील कंपनीकडून ३५ ई-बस भाडेतत्वावर घेऊन त्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या बस येणार-येणार असे वारंवार सांगितले जात आहे, मात्र या बसचे आगमन वारंवार लांबणीवर पडत आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, जाधववाडी भागातील बसडेपोमध्ये ई-बसच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारल्याशिवाय या बस आणून उपयोग नाही. चार्जिंग स्टेशन्ससाठी हायटेन्शन लाइनची आणि वीज उपकेंद्राची गरज आहे.

या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे. मात्र काम पूर्ण होण्यासाठी किमान तीन महिने लागतील असा अंदाज आहे. चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आल्यावर हैदराबादहून ई-बस आणून त्या चालवण्यात येतील. जून-जुलै महिन्यात या बस शहरात येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चार्जिंग स्टेशन कागदावरच

इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी जाहीर केले होते. मात्र अद्याप एकही स्टेशन सुरू झालेले नाही. महापालिकेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागितले होते, पण एकही प्रस्ताव समोर आलेला नाही, त्यामुळे चार्जिंग स्टेशनला ग्रहण लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT