sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : तळीराम शिक्षक वर्गातच विद्यार्थ्यांसमोर झिंगाट ; त्रस्त विद्यार्थ्यांकडूनच स्टिंग ऑपरेशन, टेबलावर दारूची बाटली

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील बागायतदार जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेत शैक्षणिक क्षेत्राला कलंक लावणारा प्रकार घडला. एक शिक्षक मद्य प्राशन करून विद्यार्थ्यांना शिकवत होता.

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर / शिऊर : वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील बागायतदार जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेत शैक्षणिक क्षेत्राला कलंक लावणारा प्रकार घडला. एक शिक्षक मद्य प्राशन करून विद्यार्थ्यांना शिकवत होता. पालक तसेच विद्यार्थ्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून याबाबत शिऊर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. केंद्रप्रमुखांनीही याबाबत पंचनामा केला.

शिऊर केंद्रांतर्गत बागायतदार वस्तीवर जिल्हा परिषदेची शाळा आहे. येथे इयत्ता १ ते ४ पर्यंतचे वर्ग आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून येथील शिक्षक सुधीर देशमुख हा वर्गातच मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांना शिकवत होता.

विद्यार्थ्यांनी ही गोष्ट पालकांना सांगितले. यानंतर मंगळवारी पालकांनी व विद्यार्थ्यांसह मिळून स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरविले. दुपारी ३ च्या सुमारास पालकांनी विद्यार्थ्याकडे मोबाइल देऊन व्हिडिओ करण्यास सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या प्रतापाचे चित्रिकरण केले. यात शिक्षक चक्क वर्गातच टेबलवर मद्याची बॉटल ठेवून चखणा खात असताना दिसला. यानंतर पालक, सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेऊन देशमुखला जाब विचारला. याबाबत तत्काळ गटशिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आली.

शिक्षकाच्या वर्तनाबद्दल केंद्रप्रमुखाच्या कानावर विषय टाकला होता. मात्र, त्यांनी मी काहीच करू शकत नाही, असे सांगितले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार आम्हाला सर्वांसमोर आणवा लागला.

- ज्ञानेश्वर जाधव (पालक)

शिक्षकाबाबत तक्रार मिळाल्यानंतर शाळेला भेट दिली. त्यावेळी शिक्षक देशमुख हे दुपारी ३.४५ वाजता मद्यधुंद स्थितीत आढळून आले. उपस्थित पालकांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. शाळेच्या वेळेत करण्यात आलेल्या या पंचनाम्यात दारूच्या बाटल्या व इतर साहित्य आढळून आले. -साईनाथ कवार, केंद्रप्रमुख,

शिक्षक स्वतःचे कर्तव्य पार पाडत असताना मद्यप्राशन केल्याचे आढळला. त्यामुळे शिक्षकाविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- भरत मोरे, सपोनि, शिऊर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

Ganeshotsav 2025: ढोल-ताशा सरावासाठी तयार आहात? 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Akola Elections: अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम; इच्छुकांमध्ये विविध प्रतिक्रिया

राज्य उत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’ नको

'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; हास्यजत्रेमधील 'हा' अभिनेता दिसतोय मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT