sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : जिल्हाधिकारी कार्यालय ठप्प

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप, अभ्यागत आले नाहीत

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १४) संप केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज दिवसभर ठप्प होते. या संपात जिल्ह्यातील ४० हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला. संपाच्या पहिल्या दिवशी राज्य तलाठी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत जुन्या पेन्शनच्या मागणीचा प्रश्‍न प्रकर्षाने मांडला.

यात राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, इंदुमती थोरात, विभागीय सचिव महेंद्र गिरगे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष सतीश भदाणे, संजय महाळंकर, सुरेश करपे सहभागी होते. संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी शुकशुकाट दिसून आला. अभ्यागतही कार्यालयात आले नाहीत. फोनवरूनच अनेकांना सुनावण्यांची तारीख सांगण्यात आली.

कार्यालयात वरिष्ठ अधिकारी दिसून आले नाही. जिल्हा प्रशासनातील ९६३ पैकी ९५५ कर्मचारी संपात सहभागी होते. संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. देविदास जरारे यांनी दिला.

या संघटनांनी घेतला सहभाग

राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात राज्य तलाठी संघ, नर्सेस फेडरेशन, महसूल, पाटबंधारे, पोलिस, भूमी अभिलेख, कास्ट्राइब, वनविभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, कारागृह, भूजल सर्वेक्षण, पशुसंवर्धन, घाटी, वाहनचालक, चतुर्थश्रेणी, शिक्षक सेना, शिक्षक भारती, शिक्षक परिषद, शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, विद्यापीठ, राज्य उत्पादन शुल्क, माजी सैनिक संघटना, एफडीए संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, कोषागार संघटना, राज्य विमा कामगार दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले

Rahul Gandhi : 'राहुलजी! लवकर लग्न करा... आम्ही मिठाईच्या ऑर्डरची वाट पाहतोय'; राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

शुभमन गिल Asia Cup साठी संघात नकोय! सूर्यकुमारने केलेला विरोध? पण गंभीर-आगरकर यांनी...

Kolhapur Crime News : वाहनांचे नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांची रेकी करून दागिने चोरायचे, पण पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT