Student initiative for summer water for the flying birds 
छत्रपती संभाजीनगर

चिव चिव ये, दाणा खा, पाणी पी...; जालन्‍यात उन्हाळ्यानिमित्त विद्यार्थ्यांचा पुढाकार

उन्हाचा पारा वाढत असताना उडत्या पाखरांना दाणा- पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना : उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना उडत्या पाखरांना दाणा- पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. बालपणीच्या चिव चिव ये, दाणा खा, पाणी पी ! असा जणू अनुभव शालेय विद्यार्थी घेत आहेत, हे विशेष.

संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उन्हाची तीव्रता वाढताच घरासमोरील झाडांवर, छतावर मातीचे परळ व वेगवेगळ्या भांड्यात चिमण्यांसाठी,पक्षांसाठी दाणा पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे पाण्यासाठी पक्षी सर्वत्र भटकंती करतात. पक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये भूतदया निर्माण व्हावी म्हणून विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी घरासमोरील झाडावर पाखरांच्या दाणा पाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.या उपक्रमात झाडांवर परळ आणि विविध मातीची भांडी बांधून दाणा- पाण्याची व्यवस्था विद्यार्थी करीत आहे.

शाळेतील विद्यार्थी अंकिता नन्नवरे, आस्था भालेराव,वैष्णवी पुंड, विनायक जाधव,रेवती इंगळे, श्रुती भालेराव, प्रसाद अरगडे, अंजली उगले, तेजस पवार या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला घेतला आहे. रोज पक्षांसाठी दाणा- पाण्याची व्यवस्था हे विद्यार्थी करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सचिव विजय देशमुख,विनायक देशपांडे, प्रा.राम भाले, प्रा.केशसिंह बगेरीया,डॉ. जुगलकिशोर भाला यांनी कौतुक केले आहे.

''आता ऊन वाढत असल्याने पक्ष्यांना पाण्याची सुविधा करावी,असा उपक्रम आमचे रामदास कुलकर्णी सर यांनी आम्हांला दिला. मी रोज त्यात चिमण्यासाठी पाणी टाकते व चिमण्या पाणी पितानाचा आनंद शब्दात सांगू शकत नाही.''

- अंकिता नन्नवरे विद्यार्थिनी, जालना

''उन्हाळ्यात चिमणी पाखरासाठी मी दाणे टाकते आणि पाणी ठेवते. यामुळे वेगळाच आनंद मिळतो.''

- रेवती इंगळे विद्यार्थिनी, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT