नऊ कारखान्यांचे ५.९४ लाख टन गाळप
कंचेश्वर शुगरचा साखर उतारा सर्वाधिक; नॅचरल शुगर, कंचेश्वर गाळपात आघाडीवर
-----
धाराशिव, ता. १५ : चालू गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप वेगाने सुरू झाले आहे. आतापर्यंत नऊ कारखान्यांनी मिळून ५ लाख ९४ हजार ६८९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ४ लाख ३६ हजार ७५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामाच्या सुरवातीच्या टप्प्यात जिल्ह्याचा सरासरी निव्वळ साखर उतारा ७.३४ टक्के नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या नऊ कारखान्यांमध्ये चार सहकारी आणि पाच खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांची एकत्रित दैनिक गाळप क्षमता ३४ हजार ५०० टन आहे. सहकारी कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता १२ हजार ५०० टन असून, त्यांनी आतापर्यंत १ लाख ५२ हजार ३६० टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १ लाख १८ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा ७.७७ टक्के आहे.
दुसरीकडे, पाच खासगी कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता २२ हजार टन आहे. या कारखान्यांनी ४ लाख ९ हजार ८४८ टन उसाचे गाळप करून ३ लाख ३ हजार ९७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ७.५८ टक्के नोंदविण्यात आला आहे.
-----
गाळप हंगामात १७ कारखाने
हंगामाच्या सुरवातीच्या टप्प्यात तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर शुगरने सर्वाधिक ८.२५ टक्के साखर उतारा नोंदविला आहे. एकूण गाळपाच्या बाबतीत नॅचरल शुगर (रांजणी) आणि कंचेश्वर शुगर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्यातील १७ साखर कारखाने गाळप हंगामात सहभागी झाले होते. यंदा आतापर्यंत नऊ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.
-----
प्रमुख कारखान्यांची स्थिती
कारखाना...दैनिक क्षमता (टन)...ऊस गाळप (टन)...साखर उत्पादन (क्विंटल)...साखर उतारा (टक्के)
भैरवनाथ शुगर वर्क्स (तेरणा, ढोकी)...५,०००...६५,२८०...४२,२००...६.४६
भैरवनाथ शुगर वर्क्स (शिवशक्ती, वाशी)...१,२५०...२५,६३०...१५,८००...६.१६
भैरवनाथ शुगर वर्क्स (सोनारी, परंडा)...७,५००...८९,३३३...६०,७५०...६.८०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर...५,०००...६६,९०३...५२,३६०...७.८३
कंचेश्वर शुगर लि. (मंगळूर)...३,५००...१,०६,५२०...८७,८५०...८.२५
धाराशिव साखर कारखाना (चोराखळी)...२,०००...१७,७७०...१२,४५०...७.०१
भीमाशंकर शुगर मिल्स (पारगाव)...५००...३४,८६५...२४,५७०...७.०५
नॅचरल शुगर (रांजनी)...८,५००...१,५२,३६०...१,१८,३५०...७.७७
नृसिंह (इंदापूर)...१२५०...३६०२९...२२४२५...६.२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.