छत्रपती संभाजीनगर

ऊस उत्पादकांचे अजूनही १९४ कोटी रुपये थकलेले

CD
ऊस उत्पादकांचे अजूनही १९४ कोटी रुपये थकलेले ---- राज्यात १८० कारखान्यांनीच दिली १०० टक्के एफआरपी --- छत्रपती संभाजीनगर, ता. २२ : राज्यातील साखर कारखान्यांनी २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादकांना देय असलेल्या एफआरपीपैकी ९९.५२ टक्के रक्कम अदा केली आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या केंद्राच्या साखर संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यातील २१० कारखान्यांनी आतापर्यंत १,०४५.६३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. प्रत्यक्ष एफआरपीपोटी ४० हजार २५२ कोटी रुपये अदा करण्यात आले असून, १९४ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत. हंगामात उसाची एकूण सकल एफआरपी (एच ॲण्ड टीसह) ४० हजार ४४६ कोटी रुपये होती. त्यापेक्षा अधिक म्हणजे ४१ हजार ७३० कोटी रुपये देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, एच ॲण्ड टी वगळून प्रत्यक्ष एफआरपीची तुलना केल्यास ४० हजार २५२ कोटी रुपये अदा झाले असून, १९४ कोटी रुपयांची थकबाकी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्याचे प्रमाण ९९.५२ टक्के एवढे नोंदले गेले आहे. यात राज्यातील १८० साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची शंभर टक्के एफआरपी अदा केली आहे. २६ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिली आहे. दोन कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के, तर आणखी दोन कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी अदा केली आहे. ---- १५ कारखान्यांना वसुलीची नोटीस थकबाकी असलेल्या कारखान्यांपैकी १५ कारखान्यांविरोधात आरआरसी (महसूल वसुली प्रमाणपत्र) जारी करण्यात आल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. यात सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी कारखाना, श्री संत करुणादास सहकारी कारखाना, छत्रपती संभाजीनगर येथील पैठणचा सचिन घायाळ शुगर मिलकडे सर्वाधिक ४० टक्क्यांपर्यंत ऊस उत्पादकांचे पैसे थकलेले असल्याचे केंद्रीय साखर संचालनालयाच्या अहवालात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT