Water Poison sakal
छत्रपती संभाजीनगर

Water Poison : हौदातील पाणी प्यायल्यानंतर दहा जनावरे दगावली ; तिडका येथील घटना, ११ अत्यवस्थ

हौदातील पाणी पिल्याने विषबाधा होऊन दहा जनावरे दगावली, तर अकरा जनावरे अत्यवस्थ झाल्याची घटना तिडका (ता. सोयगाव) येथे मंगळवारी (ता. १९) घडली. सोयगाव, बनोटी येथील पशुसंवर्धन पथक तिडका येथे तळ ठोकून अत्यवस्थ जनावरांवर उपचार करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

बनोटी : हौदातील पाणी पिल्याने विषबाधा होऊन दहा जनावरे दगावली, तर अकरा जनावरे अत्यवस्थ झाल्याची घटना तिडका (ता. सोयगाव) येथे मंगळवारी (ता. १९) घडली. सोयगाव, बनोटी येथील पशुसंवर्धन पथक तिडका येथे तळ ठोकून अत्यवस्थ जनावरांवर उपचार करत आहे. कुणीतरी माथेफिरूने हौदातील पाण्यात विष टाकले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.

तिडका शिवारातील संदीप मगर यांच्या मालकीच्या गट क्रमांक ५५ मधील शेतात संदीप मगर यांची पाच जनावरे, तर विष्णू मगर यांची चार आणि मुबारक पटेल, जगदीश मगर यांची एकूण एकवीस जनावरे सकाळी चारण्यासाठी सोडली होती. गुरांनी हौदात पाणी पिल्यानंतर एक-एक करत जमिनीवर पडली.

शेतकऱ्याने सोयगाव आणि बनोटी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार सुरू केले. परंतु, उपचारादरम्यान संदीप मगर यांची पाच जनावरे, विष्णू मगर यांची चार जनावरे आणि मुबारक पटेल यांची दोन जनावरे अशी एकूण दहा जनावरे दगावली.

यात एक म्हैस, वगार, तीन बैल, दोन गायी आणि एक वासरू अशी दहा जनावरे दगावली. उर्वरित ११ जनावरे धोक्याच्या पातळीबाहेर आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी विनीत बुखारी, बी.एस. कांबळे, मंगेश काळे, अदिनाथ साबळे, खासगी डॉक्टर अरुण महाजन व मोहित जाधव यांच्या पथकाला अकरा जनावरे वाचविण्यात यश आले. विषबाधा कशामुळे झाली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT