Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : ‘टीडीआर’ होणार ऑनलाइन

बांधकाम व्यावसायिकांसाठीचा निर्णय नियमानुसारच

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या टीडीआरच्या (हस्तांतरण विकास हक्क) फाइल्स आता ऑनलाइन होणार आहेत. आतापर्यंत किती जणांना टीडीआर दिला, याची यादी महापालिकेच्या वेबसाइटवर टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरातील ३०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांधकाम करताना अतिरिक्त एफएसआयसाठी ५० टक्के टीडीआर वापरण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय यूडीसीपीआरच्या (एकात्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली) नियमानुसार घेतल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.

शहरातील टीडीआर घोटाळा अनेक वर्षे गाजला. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तत्कालीन ‘टीडीआर’ होणार ऑनलाइन नगर रचना सहायकांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. हा विषय तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांनी विधानसभेत देखील मांडला. त्यावर नगर विकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेतील सर्व टीडीआर प्रकरणांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची घोषणा केली.

त्यानुसार नगर रचना सहसंचालक कावळे यांच्या समितीने चौकशी करून अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. मात्र, या अहवालाचे पुढे काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे. त्यावेळी नगर रचना विभागाने सुमारे २२१ प्रकरणांतील टीडीआर लोड करण्याच्या प्रक्रियेला मनाई केली आहे होती. दरम्यानच्या काळात टीडीआरचे महत्त्व हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे प्रशासकांनी शहरातील ३०० स्केअर मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त एफएसचा वापर करताना ५० टक्के टीडीआर वापरणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाला माजी उपमहापौर संजय जोशी यांनी विरोध केला होता.

टीडीआर वापरणे बंधनकारक

यासंदर्भात जी. श्रीकांत यांनी सांगितले की, विकास आराखड्याच्या अनुषंगाने भूसंपादन करताना महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देणे शक्य नाही. त्यामुळे टीडीआरचा वापर वाढला तरच शहरातील रस्ते मोकळे होतील. त्यामुळे टीडीआर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत किती जणांना टीडीआर दिला, तो कोणत्या ठिकाणी लोड झाला, याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर टाकली जाणार असल्याचे नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांनी सांगितले.

महापालिकेचे होणार नुकसान

प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, अतिरिक्त एफएसआय देताना महापालिकेला प्रिमियमच्या स्वरूपात रक्कम मिळते. मात्र, टीडीआरचा वापर झाला तर महापालिकेचे नुकसान होईल. पण शहराच्या विकासाच्या अनुषंगाने टीडीआरचा वापर वाढला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: माझ्या स्तरावर मी गंभीर दखल घेतली आहे - राहुल नार्वेकर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

Eleventh Admission : अकरावीच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

SCROLL FOR NEXT