sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे ; खेडेकर

मराठा सेवा संघातर्फे ता.१६ ते ३१ जानेवारीदरम्यान जनसंवाद दौरा काढला जाणार आहे. या दौऱ्यानिमित्त शुक्रवारी ॲड. खेडेकर हे छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खेडेकर म्हणाले,

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा समाजाला ओबीसीतून संविधानिक पद्धतीने आरक्षण मिळावे, अशी मराठा सेवा संघाची पूर्वीपासूनच मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. मनोज जरांगे पाटील हीच मागणी पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा आहे. पण, त्यांना मी नेता मानत नाही’’, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर शुक्रवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत म्हणाले.

मराठा सेवा संघातर्फे ता.१६ ते ३१ जानेवारीदरम्यान जनसंवाद दौरा काढला जाणार आहे. या दौऱ्यानिमित्त शुक्रवारी ॲड. खेडेकर हे छत्रपती संभाजीनगरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खेडेकर म्हणाले, ‘‘मराठवाडा सोडता इतर विभागातील मराठे हे ओबीसीत आहेत. ते त्याचा लाभही घेत आहेत.

इंग्रजाच्या काळापासून त्यांच्या नोंदी सापडत आहेत. मराठवाड्यात फक्त अहंकारी भूमिका आणि ओबीसी लावल्यास कमीपणा वाटत असल्याने अनेकजण वंचित राहिले. विदर्भात पंजाबराव देशमुख यांनी मराठ्यांना ओबीसीत सामावून घेतल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी अडवत त्यांचे वाहन फोडण्यात आले. हे वाहन फोडणाऱ्यांपैकी काहीजण आज पश्‍चात्ताप करीत आहेत. आता ५४ लाख नोंदी सापडल्या असल्या तरी त्यात मराठवाड्याच्या नोंदी कमी आहे. यामुळे राज्य शासनाने मागास आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करीत समाजाला मागास सिद्ध करावे आणि त्यानंतर संविधानिक पद्धतीने ओबीसीतून समाजाला आरक्षण द्यावे.’’

हिंगोली, बुलडाणाच्या जागेसाठी आग्रही

आम्ही महाविकास आघाडीत नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे. यासंदर्भात या पक्षासोबत आमच्या वेळोवेळी बैठकीही झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही ठाकरे यांच्याकडे हिंगोली आणि बुलडाणा या दोन जागेसाठी आग्रही आहोत, असेही खेडेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT