sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : रेल्वेचा प्रवास होणार विनाअडथळा ; संभाजीनगर-अंकाई मार्गाचे दुहेरीकरण ३० महिन्यांत

अंकाई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्ग सध्या एकेरी आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणासाठीची (डब्लिंग) निविदा कमी बोली लावणाऱ्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाली. यामुळे आता या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे. आता एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी असे दोन रेल्वे ट्रॅक असतील.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अंकाई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर हा रेल्वेमार्ग सध्या एकेरी आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणासाठीची (डब्लिंग) निविदा कमी बोली लावणाऱ्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाली. यामुळे आता या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे. आता एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी असे दोन रेल्वे ट्रॅक असतील. यामुळे प्रवास आणि मालवाहतूक विनाअडथळा होणार आहे. तीस महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचे यासंदर्भात सूत्रांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर ते अंकाई (मनमाड) ९८.२५ किलोमीटर अंतराच्या या दुहेरी ट्रॅकचा प्रकल्प ९६०.६४ कोटी रुपये खर्चाचा आहे. यापैकी २१४ कोटी निधी वितरणाला मंजुरी मिळाली. उर्वरित निधी टप्प्या-टप्प्यात दिला जाणार असून, पुढील तीस महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल. यामध्ये रेल्वे ट्रॅकबरोबरच विद्युतीकरण, सिग्नलिंगच्या कामांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील करंजगाव आणि छत्रपती संभाजीनगर स्टेशनसहित छत्रपती संभाजीनगर ते अंकाईदरम्यान सध्या एकच रेल्वे ट्रॅक आहे. यामुळे एकाच वेळी आमने-सामने दोन प्रवासीगाड्या किंवा मालगाड्या आल्या तर पुढचा ट्रॅक मोकळा होईपर्यंत कोणा एकाला थांबून राहावे लागते. मात्र, आता या प्रकल्पांमध्ये दोन समांतर रेल्वेट्रॅक होतील एक जाण्यासाठी आणि एक येण्यासाठी यामुळे कोणत्याही रेल्वेगाडीला थांबावे लागणार नाही म्हणजे हा प्रवास विनाअडथळ्याचा पार पडणार आहे.

सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी २२५ कोटी

धाराशिव, सोलापूर, : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोलापूर - धाराशिव या ८४.४४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गासाठी २२५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक तरतुदीसह युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला ८०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: अजित पवारांनी धनंजय मुंडेंसाठी पर्याय शोधला? त्यांना भरभरुन दिलं, बाबरी मुंडेंना काय मिळणार? एका दगडात तीन पक्षी

CM Devendra Fadnavis: सराला बेटाच्या विकासाला चालना देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; बेटाच्या विकासासाठी १०९ कोटींचा आराखडा मंजूर

Blood Circulation Disorders Deaths: रक्ताभिसरणाच्‍या आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू; हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांवर ताण येण्याच्या घटनांमध्ये वाढ

Leopard Drone Footage : बिबट्या आला पळा पळा..., शेतकऱ्यांनो सावधान! उसात दबा धरून बसलाय; ड्रोनमध्ये कैद

VIDEO : हृदयद्रावक! रायफलधारी व्यक्तीनं 25 कुत्र्यांना गोळ्या झाडून केलं ठार; रस्त्यावर वेदनेने तडफडताहेत कुत्री, रक्ताने माखले रस्ते

SCROLL FOR NEXT