sakal
sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : यंदा विद्यार्थ्यांना मिळणार दोन गणवेश

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : समग्र शिक्षा अंतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरुन शालेय गणवेश उपलब्ध करुन देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. यंदा मोफत गणवेश योजनेसाठी एकूण ३६ लाख ७ हजार २९२ लाभार्थ्यांकरीता २१६४३.७५ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जाणार आहेत.

या संदर्भातील अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचना राज्यप्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले, अनु. जमाती मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील मुलांना वितरीत केले जातात. समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकानुसार केंद्राकडून गणवेशासाठी ३६ लाख ७ हजार २९२ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता प्रति गणवेश तीनशे रुपये या दराने दोन गणवेश संचाकरिता ६०० रुपये प्रती विद्यार्थी या प्रमाणे २१६४३.७५ लाख रुपयांची तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे.

महत्वाच्या सूचना

समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा मंजूर निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांकडे भौतिक लक्षाप्रमाणे १५ दिवसांत वर्ग करावा इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निकषपात्र विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करावे.

शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलंब होवू नये, म्हणून सदरचे अनुदान जिल्हा स्तरावरुन थेट शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर वितरीत करावे. गणवेशाचा रंग, प्रकार स्पेशिफिकेशन इ. बाबी संदर्भात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा.

गणवेश पुरवठ्याबाबत संपुर्ण अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला असेल. केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावरुन गणवेश पुरवठ्याचे कोणतेही निर्णय घेवू नये. मुलांचे गणवेशाचे कापड उत्कृष्ट असावे, मापानुसार पक्की शिलाई केलेले असावे.

गणवेश वितरणास विलंब होणार नाही किंवा लाभार्थी विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहाणार नाही, याची दक्षता शाळा, व्यवस्थापन समिती, शिक्षण विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मनपा प्रशासन अधिकारी, जिल्हा परीषद शिक्षणाधिकारी यांनी घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT