LTR26B15617
लातूर :‘बसव-देशिकेंद्र स्वरमहोत्सवा’चे उद्घाटन करताना गहिनीनाथ महाराज औसेकर, माधवराव पाटील टाकळीकर, शिरीष उटगे, तुकाराम पाटील, राम बोरगावकर आदी.
--
माझे कोण आहे तुजवीण देवा!
-
‘बसव-देशिकेंद्र स्वरमहोत्सवा’त भक्तिसंगीताचा त्रिवेणी संगम
-------------------
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १३ : लिंगायत शरण फाउंडेशनच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात घेण्यात आलेला ‘बसव-देशिकेंद्र स्वरमहोत्सव’ सुरेल स्वरांनी रंगला. भक्ती, वचन आणि शास्त्रीय संगीताचा सुरेल त्रिवेणी संगम असलेल्या या महोत्सवाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, लिंगायत शरण फाउंडेशनचे अध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर, शिरीष उटगे, तुकाराम पाटील, राम बोरगावकर, उज्ज्वला भाऊसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवात दीपिका गीते-डिगोळे यांचे बहारदार गायन झाले. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘अवचिता परिमळू झुळकला अळूमाळू’, ‘घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला’ ही भावगीते आणि ‘माझे कोण आहे तुजविण देवा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ ही भक्तिगीते सादर केली. भार्गवी काशीद हिने सादर केलेल्या सुरेल नाट्यगीताला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर गायक प्रा. विजयकुमार धायगुडे यांनी आपल्या दमदार आवाजात छोटा ख्याल सादर केला. पुढे त्यांनी ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘कानडा राजा पंढरीचा’ आणि ‘जगत में झूटी देखी प्रीत’ ही एकापेक्षा एक सरस गीते सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. भैरवीने गायनाची सांगता केली. गणेश सुतार व संतोष थोरात यांनी हार्मोनियमवर, परमेश्वर पाटील यांनी तबल्यावर, महेश वंगवाड यांनी पखवाजवर, कल्याण पाटील यांनी तानपुऱ्यावर साथ केली. गुरू बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी लिंगायत शरण फाउंडेशनचे मुख्य संघटक इराना पावले, सिद्राम डोंगरगे, विजयकुमार गुत्ते, राजेश विभुते , शेखर हविले, प्रा. नागेश सुगरे, शिवानंद मिटकरी आदींनी पुढाकार घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.