Chhatrapati Shivaji Maharaj Statue sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : पर्यटनाची राजधानी बनले आता भव्य-दिव्य पुतळ्यांचे शहर

महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्‍वर यांचे सर्वांत मोठे पुतळे छत्रपती संभाजीनगरात.

माधव इतबारे

छत्रपती संभाजीनगर - महापालिकेने दोन वर्षांपूर्वी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य म्हणजेच चबुतऱ्यासह ५२ फूट उंचीचा पुतळा उभारला. यानंतर आता महात्मा बसवेश्‍वर यांचा १६ फूट उंचीचा राज्यातील पहिलाच मोठा, तर महाराणा प्रताप यांचा १६ फूट उंचीचा देशातील सर्वांत मोठा पुतळा शहरात उभारला जाणार आहे.

महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा क्रांती चौक भागात २०२२ मध्ये उभारलेला अश्वारूढ पुतळा देशातील सर्वांत उंच पुतळा असल्याचे मानले जात आहे. या पुतळ्याची उंची २१ फूट आहे, तर वजन सात टन आहे. पुतळा ब्राँझ धातूच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे. ज्या चबुतऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे, त्या चबुतऱ्याची उंची ३१ फूट आहे. पुतळा आणि चबुतरा याची एकत्रित उंची मोजल्यास पुतळ्याची एकूण उंची ५२ फूट आहे.

चबुतऱ्यामध्ये २४ कमानी कोरल्या असून, त्यात २४ मावळ्यांच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे ऑनलाइन पद्धतीने प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यावेळी दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी पुतळ्याचा अनावरण सोहळा ऑनलाइन पद्धतीने पाहिला आणि शिवरायांना अभिवादन केले हा एक रेकॉर्डच होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन भव्यदिव्य पुतळ्यांमुळे शहर चर्चेत आहे. महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा सिडको परिसरातील कॅनॉट उद्यानात उभारण्यात येणार आहे.

हा पुतळा शहरातील मडिलगेकर आर्ट गॅलरी येथे तयार करण्यात आला. ११ महिन्यांत प्रख्यात शिल्पकार निरंजन मडिलगेकर, शिल्पा मडिलगेकर, समीर मडिलगेकर व सहायक एस. एस. सूर्यवंशी यांनी तयार केलेला हा पुतळा देशातील सर्वांत मोठा अश्वारूढ पुतळा ठरणार आहे. यापूर्वी राजस्थानमधील घाटनी उदयपुरात १२ फूट उंच पुतळा उभारण्यात आला.

मुंबईत माझगावात १५ फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. पाठोपाठ अकरा वर्षांपूर्वी जळगावात १५ फुटांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र, आता संभाजीनगरात तब्बल १६ फूट उंचीचा पुतळा देशातील सर्वांत मोठा अश्वारूढ पुतळा मानला जाणार आहे. लिंगायत समाजाचे दैवत महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हडको एन-१२ येथील स्वामी विवेकानंद उद्यान परिसरात बसवण्यात येणार आहे.

१६ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा हा पुतळा असेल. यासाठी एक कोटी १३ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर असून, हा पुतळादेखील मडिलगेकर आर्ट गॅलरीमध्येच तयार होत आहे. या पुतळ्याचा चबुतरा १२ फूट रुंद, २५ फूट लांब आणि २० फूट उंचीचा आहे. राज्यात महात्मा बसवेश्‍वरांचे अनेक ठिकाणी पुतळे आहेत, त्याची उंची १५ फुटापर्यंत आहे, असे मडिलगेकर यांनी सांगितले.

शिवरायांचे तब्बल १५० पुतळे

छत्रपती शिवरायांचे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्बल १५० पुतळे आहेत. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी शहरातील सर्व पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाते. या शिवाय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांचेही अनेक ठिकाणी पुतळे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT