election  sakal
छत्रपती संभाजीनगर

Loksabha Election 2024 : मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सहायक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी संजीव मोरे यांची नांदेड (पुनर्वसन) उपजिल्हाधिकारीपदी, हिंगोलीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत यांची धाराशिवच्या विशेष भूसंपादन अधिकारीपदी, नांदेडच्या उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांची परभणीच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारीपदी, संगीता चव्हाण यांची परभणीच्या

उपजिल्हाधिकारीपदी, कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांची शिरपूर (धुळे) उपविभागीय अधिकारीपदी, नांदेडच्या विशेष भूसंपादन अधिकारी संगीता राठोड यांची बीडच्या उपजिल्हाधिकारीपदी, बीडच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांची पैठण-फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांची नांदेडच्या विशेष भूसंपादन अधिकारीपदी, अंबाजोगाइचे

उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांची निलंगाच्या उपविभागीय अधिकारीपदी, लातूरचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची हिंगोली, धाराशिवच्या जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची छत्रपती संभाजीनगरच्या सहायक आयुक्तपदी, शिरीष यादव यांची नांदेडच्य विशेष भूसंपादन अधिकारीपदी तर पुणे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांची भोकरच्या उपविभागीय अधिकारीपदी तर नवी मुंबर्इ, सिडकोचे उपजिल्हाधिकारी संतोष जाधव यांची नांदेडच्या (रोहयो) उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागातील पाच उपायुक्तांच्या बदल्या

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपायुक्तांच्या (वरिष्ठ श्रेणी) विशेष बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरातील विभागीय उत्पादन शुल्क उपायुक्त प्रदीप पवार यांची ठाण्याच्या विभागीय उपायुक्तपदी, नांदेडचे विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांची नाशिकच्या विभागीय उपायुक्तपदी, बाबू तडवी यांची नाशिकच्या विभागीय उपायुक्त पदावरून नांदेडच्या उपायुक्तपदी तर संगीता दरेकर यांची मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त पदावरुन छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय उपायुक्तपदी तर प्रसाद सुर्वे यांची ठाण्याच्या विभागीय उपायुक्त पदावरून अंमलबजावणी व दक्षता विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT