Without Vehicle mask No the vehicle Photo Immediately To RTO sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : विनामास्क वाहन नको रे बाबा...!

वाहनधारकासह वाहनाचा फोटो जाईल लगेच आरटीओकडे!, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोविडचा (Covid) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ओमिक्रॉनचा (Omicron) संभाव्य धोका लक्षात घेऊन शहरातील चौकाचौकांत प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांनी विनामास्क वाहनधारक दिसताच त्यांच्या वाहनाचा फोटो (Vehicle Photo) काढून पुढील कारवाईसाठी आरटीओकडे (RTO) पाठवावा. आरटीओंनी त्या वाहनधारकावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.२०) कोविड टास्क फोर्सची जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, सहआयुक्त बी. बी. नेमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आदी उपस्थित होते. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा टास्क फोर्स समितीने अनेक निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांशी संबंधित यंत्रणेने काटेकोर अंमलबजावणी करून संसर्गापासून आपल्या जिल्ह्याचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले. शहरातील चौकाचौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करा, प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने खासगी रुग्णालयात ओपीडीबरोबरच आरटीपीसीआर तपासणी सक्तीची करावी, कोविड पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त नागरिकांचे गृह विलगीकरण बंद करुन संस्थात्मक विलगीकरण करावे आदी सूचना दिल्या.

जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी प्रयोगशाळेचा प्रस्ताव पाठवा

टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ओमिक्रॉन संसर्ग तपासणीत महत्वाच्या जिनोम सिक्वेन्सींग तपासणीसाठी प्रयोगशाळेचा प्रस्ताव तयार करून शासनास पाठविण्याचे निर्देश घाटी प्रशासनाला दिले. डिसेंबरअखेर मोठे उत्सव, लग्न समारंभ, आणि अनावश्यक गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन न करण्याचे निर्देश दिले. शहरातील चौकाचौकात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संदेशाचे टि शर्ट व कॅप घातलेल्या प्रशासनाकडून नियुक्त कर्मचाऱ्यांकडून लसीकरण आणि मास्क घालण्याबाबत संदेश दिला जाणार आहे. तसेच लसीकरण कामकाजात अडथळा आणणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील नीलकमल फर्नीचर सील करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी दिले.

यंत्रणेला सज्जतेच्या सूचना

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढवाव्यात, ज्या नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी तो तात्काळ घ्यावा, लसीकरणासाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ऑक्सिजन बेड आणि आयसीयु बेड, यासह विशेष बेडची सुविधा सज्ज ठेवण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT