sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : पोलिसांकडून ‘मध्यवर्ती’ची झाडाझडती

देर आये, दुरुस्त आये : चोऱ्या रोखण्यासाठी उचलले पाऊल

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकात होणाऱ्या चोऱ्यांबद्दल दैनिक ‘सकाळ’ने शनिवारच्या अंकातून मुद्दा उपस्थित केला होता. यावर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची गंभीर दखल घेत शनिवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बसस्थानक गाठत सर्वत्र झाडाझडती घेतली. एसटी प्रशासन आणि हॉकर्सची बैठक घेत यावेळी चोऱ्या टाळण्यासाठी कडक सूचना करण्यात आल्या.

गुरुवारी सायंकाळी चोरट्यांनी अवघ्या दोन तासांत तीन घटनांमध्ये ‘हात की सफाई’ करत ४ प्रवाशांचे ऐवज लंपास केले होते. यापूर्वी देखील या परिसरात प्रवाशांचा ऐवज लांबवण्याचे प्रकार घडले आहेत. ‘सकाळ’ने या प्रकरणी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. चोरट्यांना येथील काही अवैध विक्रेते देखील मदत करत असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले आहे. हे वृत प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी शहर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह मध्यवर्ती बसस्थानक गाठले. पोलिस चौकी, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर प्रवाशांनी ‘देर आये, दुरुस्त आये’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यापुढे २४ तास पोलिसांचा वावर

बसस्थानक परिसरात पोलिस चौकी आहे. मात्र, या ठिकाणी अनेकदा चौकीत कोणी नसल्याची प्रवाशांची तक्रार होती. या अनुषंगाने देखील पोलिस अधिकाऱ्यांनी येथे नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नियुक्त पोलिसांना चौकीत थांबण्याचे तसेच पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे देखील कर्मचारी आता बसस्थानक परिसरात गस्तीसाठी नेमण्यात आले आहेत.

एसटी अधिकारी, हॉकर्सची बैठक घेत सूचना

एसीपी संपत शिंदे आणि निरीक्षक पाटील यांनी चोऱ्या रोखण्यासंदर्भात एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली. अधिकृत हॉकर्स, फेरीवाले यांची यादी मागवण्यात आली. अनधिकृत फेरीवाले, ट्रॅव्हल्स एजंट, खासगी दलाल परिसरात फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.

मध्यवर्ती बसस्थानकाला आज भेट देत तेथील पाहणी केली. बंदोबस्त कसा आहे, कर्मचारी किती आहे याची चौकशी केली. डेपो मॅनेजर आणि पोलिस निरिक्षकांना गुन्हे रोखण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

— संपत शिंदे,

सहायक पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT