Gangapur Accident News
Gangapur Accident News 
छत्रपती संभाजीनगर

लग्नसमारंभ आटोपून घरी निघालेल्या जीपला जोराची धडक; दोघे ठार, तर चार जखमी

नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : आडगाव (ता.पैठण) येथून लग्नसमारंभ आटोपून गावाकडे घरी निघालेल्या क्रुझर जीपला समोरून येणाऱ्या आयशरने शिवपुर फाटा (ता.गंगापूर) येथे जोराची धडक दिल्याने  दोन जण ठार, तर तीन पुरूषांसह एक महिला जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. सात) दुपारी घडली. या विषयी पोलिसांकडून माहिती मिळाली की,  मांगेगाव (ता.गंगापूर) येथील गावंडे कुंटुंब हे आपली क्रुझर जीपने (एमएच 20 सीएच 5077) पैठण तालुक्यातील आडगाव या ठिकाणी लग्गसमारंभाच्या कार्यक्रमास गेले होते. लग्न आटोपून दुपारी सर्वजण आपल्या गावाच्या दिशेने प्रवासाला निघाले होते.

मांगेगाव काही मिनिटांच्या अंतरावर असतांनाच ईसारवाडी-बिडकीन रस्त्यावर असलेल्या शिवपूर फाट्याजवळ क्रुझरचा चालक आपले वाहन अन्य वाहनाच्या पुढे घेत असताना समोरून येणाऱ्या आयशरच्या (एमएच 20 एएफ 1447) चालकाने त्या क्रुझर गाडीला समोरून जोरदार धडक दिली. त्यात क्रुझरमधील गौरव गावंडे (वय ११) व आण्णा म्हासू गावंडे (६५, दोघेही रा.मांगेगाव) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आनंदा निकम यांनी वाळूज पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप दुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुरवादा बीटचे सहायक फंजदार नारायण बुट्टे हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी गेले.

त्यांनी नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना खासगी वाहनाद्वारे पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात पाठविले असता डाॅक्टरांनी तपासून गौरव गावंडे व आण्णा म्हासु गावंडे यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. इतर जखमींवर  घाटी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेत दोघे ठार झाल्याने मांगेगावात हळहळ व्यक्त होत आहे. इसरवाडी फाटा ते शेंदुरवादा, बिडकीन , कचनेरमार्गे करमाड या रस्त्याची गेल्या अनेक दिवसापासून कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून धीम्म्या गतीने काम सुरू असून अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने ठिकाणी कामे अपूर्ण असल्याने अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यास वेगाने सुरूच आहे. संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कार्यवाही करत अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ठिकठिकाणी पांढरे-पिवळे पट्टे,दिशादर्शक फलकासह वेगमर्यादा फलक बसविण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT