two killed one injured in two wheeler accident waluj police hospital chhatrapati sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, एक जखमी

अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा होऊन दोन्ही दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Road Accident News - वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर या कामगार वसाहतीतील महाराणा प्रताप चौकात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकींचा चुराडा होऊन दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी होऊन दोन ठार झाले. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर या कामगार वसाहतीतील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी (ता.21) रोजी रात्री 10:50 वाजेच्या सुमारास झाला. याबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की,

रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात राहणारा संजय रामदास बोरुडे वय 25 वर्ष व त्याचा मित्र कल्याण प्रभाकर मानकापे हे दोघे स्प्लेंडर दुचाकी (एम एच 20, जी जे- 6025) वरुन कामगार चौकाकडून दुचाकीवर येत होते. तर एक अनोळखी तरुण हिरो होंडा दुचाकी (एम एच 20, ए एम - 9117) वर विरुद्ध दिशेने येत होता.

भरधाव असलेल्या या दोन्ही दुचाकी समोरासमोर जोरात धडकल्या. शुक्रवारी (ता.21) रोजी रात्री 10:50 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगरच्या महाराणा प्रताप चौकात झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा होऊन दोन्ही दुचाकीवरील तीनही जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती कळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारार्थ घाटीत दाखल करून दोन्ही वाहने ताब्यात घेतले. दरम्यान उपचार सुरू असताना संजय बोरुडे रा. दत्तनगर, रांजणगाव व अन्य दुचाकीवरील एक असे दोन जण ठार झाले.

कल्याण प्रभाकर मानकापे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Shakambhari Navrtri 2025: शाकांभरी नवरात्र का आहे खास? जाणून घ्या तारीख, पूजा विधी अन् महत्त्व एकाच क्लिकव

Sleep Science Explained: रात्री 8 तासांची पूर्ण झोप की दुपारची डुलकी? काय आहे फायदेशीर, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT