School TC sakal
छत्रपती संभाजीनगर

School News : युनिव्हर्सल शाळेची मुजोरी; शुल्क भरूनही टीसी देण्यास नकार

आरटीई कायद्याची पायमल्ली करत युनिव्हर्सल इंग्रजी शाळेकडून मुलांच्या दाखल्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: आरटीई कायद्याची पायमल्ली करत युनिव्हर्सल इंग्रजी शाळेकडून मुलांच्या दाखल्यासाठी अडवणूक केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आपल्या मुलाची टीसी मिळावी, यासाठी संबंधित पालकाने शुक्रवारपासून (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

चिकलठाणा परिसरातील युनिव्हर्सल शाळेविरोधात विद्यार्थी-पालकांकडून केलेल्या तक्रारींमुळे शिक्षण विभागाने या शाळेला काळ्या यादीत टाकून मान्यता रद्दची शिफारस शासनाकडे केलेली आहे. यावर आता पालक मुलांची नावे शाळेतून काढून घेत आहेत. परंतू, शाळेची पूर्ण फी भरुन दोन महिन्याची अधिक फी दिल्यानंतरही शाळा टी. सी. देण्यास नकार देत आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही.

कुणाकडे तक्रार करायची करा, असे पालकांना सांगण्यात येत असल्याचे उपोषणकर्ते महेश काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिले असल्याचे काळे यांनी सांगितले.

या संदर्भात शाळेच्या प्राचार्या सीमा गुप्ता यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्या शाळेला पत्र देखील देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान शाळेला करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT