औरंगाबाद : लसीकरणात हलगर्जी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित
औरंगाबाद : लसीकरणात हलगर्जी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लसीकरणात हलगर्जी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात हलगर्जी केल्याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा प्रेमनाथ बिऱ्हाडे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता.७) सायंकाळी काढले.

लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ यांनी थेट ग्रामीण भागात वास्तव्य करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार, जिल्ह्यातील सर्वच मेडिकल ऑफिसर आपापल्या मुख्यालयी राहून अधिकाधिक लसीकरणासाठी प्रयत्नशील आहेत परिणामी औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढली आहे. दरम्यान, गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा प्रेमनाथ बिऱ्हाडे ह्या मुख्यालयी राहत नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना प्राप्त झाली होती.

त्यानुसार, डॉ. शेळके यांनी डॉ. बिऱ्हाडे यांना सूचनादेखील केल्या होत्या. मात्र डॉ. बिऱ्हाडे यांनी या सूचनेला केराची टोपली दाखवली. परिणामी सिद्धनाथ वडगावचे लसीकरण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. सीईओ निलेश गटणे यांनी ही माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिली. चव्हाण यांनी तहसीलदार यांना पाठवले असता, सकाळी ९ पर्यंत डॉ. बिऱ्हाडे कामावर हजर नव्हत्या. यावरून चव्हाण यांनी डॉ. चित्रा बिऱ्हाडे यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवार, ७ डिसेंबर रोजी काढले आहेत. सदरील आदेश तीन महिन्यांसाठी राहणार आहेत.

निष्काळजी भोवली

ग्रामीण भागात लसीकरणासाठी सकाळ आणि संध्याकाळ हा महत्त्वाचा काळ असतानाही डॉ. बिऱ्हाडे ह्या मुख्यालयी राहत नव्हत्या. यामुळे येथे लसीकरणात प्रगती झाली नाही. सद्यःस्थिती सिद्धनाथ वडगावचे लसीकरण अत्यंत कमी आहे. पहिला डोस ६९ तर दुसरा डोस केवळ १९ टक्के आहे. कामाप्रति उदासीनता, निष्काळजीपणा, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, मुख्यालयी न राहणे आदी कारणांवरून निलंबन करण्यात येत आल्याचे पत्रात नमुद केले आहे. निलंबन काळात डॉ. बिऱ्हाडे यांचे मुख्यालय हे प्राथमिक आरोग्य केंद्र आडूळ तालुका पैठण हे राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT