vijay wadettiwar vijay wadettiwar
छत्रपती संभाजीनगर

'प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारा'

ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. याविषयीची सुनावणी लवकरच होणार आहे. दुसरा पर्याय म्हणून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आम्ही हा डाटा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले

मधुकर कांबळे

ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. याविषयीची सुनावणी लवकरच होणार आहे. दुसरा पर्याय म्हणून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आम्ही हा डाटा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले

औरंगाबाद: इतर मागासवर्गीयांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह तातडीने उभारण्यात यावेत. यादृष्टीने जागा आणि सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (ता.सहा) आश्रमशाळा व विभागातील आपत्ती व्यवस्थापनचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, उपायुक्त पराग सोमण, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, औरंगाबादचे सहायक आयुक्त पी. जी. वाभळे, बीडचे सहायक आयुक्त सचिन मडावी, जालन्याचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.एम.केंद्रे, सहायक संचालक शि.बा.नाईकवाडे, लेखा अधिकारी डॉ.सुधीर चाटे आदींची उपस्थिती होती.

श्री. वडेट्टीवार यांनी महाज्योतीच्या विभागीय कार्यालयासाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश दिले. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शाळेचा आढावा घेतला. इंग्रजीतील परिपूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या सहकार्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित व्हावा जेणेकरून इंग्रजी माध्यमाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळेल. यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी समाजकल्याण विभागामार्फत करावी, असे आदेशही यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी प्रास्ताविकात मराठवाड्यात आठही जिल्ह्यांतील धरणांची पाणी क्षमता, शेतकरी आत्महत्या, गेल्या वर्षीच्या अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत माहिती व यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी; तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विभागाने केलेल्या तयारी बाबतचा आढावा सादर केला.

इम्पिरिकल डाटासाठी न्यायालयात-
ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. याविषयीची सुनावणी लवकरच होणार आहे. दुसरा पर्याय म्हणून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आम्ही हा डाटा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांच्या भेटीविषयी विचारले असता, ‘लाव रे तो व्हिडिओ...’ असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT