Vinod Patil statement Twelve percent Maratha reservation possible aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

बारा टक्क्यांतून मराठा आरक्षण शक्य : विनोद पाटील

राज्यात अनुसूचित जाती १३ टक्के, अनुसूचित जमाती-०७ टक्के, बांठिया आयोगानुसार ओबीसी १८ टक्के असे एकूण ३८ टक्के आरक्षण होते. यात शिल्लक असलेल्या १२ टक्क्यांतून मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

औरंगाबाद : सध्या राज्यात अनुसूचित जाती १३ टक्के, अनुसूचित जमाती-०७ टक्के, बांठिया आयोगानुसार ओबीसी १८ टक्के असे एकूण ३८ टक्के आरक्षण होते. यात शिल्लक असलेल्या १२ टक्क्यांतून मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. विनोद पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षण टिकविण्याची जबाबदारी राज्यातील नव्या सरकारची राहणार आहे. युती सरकारच्या काळात सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले; परंतु दुर्दैवाने ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून कोणतेही ठोस पावले न उचलल्याने समाजाची घोर फसवणूक झाली. आता शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्काळ मागासवर्गीय आयोग नेमावा किंवा मागासवर्गीय आयोगामध्ये उपसमिती गठित करावी. या समितीला संविधानिक दर्जा देण्यात यावा, विशिष्ट कालमर्यादेमध्ये आयोगाकडून मराठा समाजाच्या परिस्थितीबाबत अहवाल घ्यावा. सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली पुनर्विचार याचिकेमध्ये व्यवस्थित बाजू मांडत १२ टक्के आरक्षणावर शिक्कमोर्तब करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT