Waluj Crime update businessman killed by bullet in head incident in waluj industrial area Sakal
छत्रपती संभाजीनगर

Waluj Crime News : डोक्यात गोळी घालून उद्योजकाचा खून;वाळूज औद्योगिक परिसरातील घटना

नरोडे खाली कोसळताच मारेकऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, गोळी झाडल्याचा मोठा आवाज आला. तो ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले.

सकाळ वृत्तसेवा

वाळूज महानगर : येथील साजापूर, क्रांतिनगरमधील बालाजीनगर येथे एका लघू उद्योजकाची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास घडली. सचिन साहेबराव नरोडे (वय ३५) असे मृताचे नाव आहे.

नरोडे हे मूळ शिल्लेगाव (ता. गंगापूर) येथील रहिवासी आहेत. ते साजापूर येथे आई शोभाबाई, वडील साहेबराव आणि मुलगी स्वरांजली (वय ११) यांच्यासोबत राहात होते. त्यांचा वडगाव येथे स्वयंपाकाची शेगडी बनविण्याचा लघुउद्योग आहे.

रविवारी रात्री आठच्या सुमारास नरोडे यांच्या मोबाइलवर एका व्यक्तीचा कॉल आला. तिने त्यांना घराबाहेर बोलावले. यावेळी वीजपुरवठा खंडित झालेला होता. नरोडे घराबाहेर पडल्यानंतर घरापासून दीडशे फूट अंतर चालत गेल्यावर मोकळ्या मैदानात संबंधित व्यक्तीने नरोडे यांच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी झाडली.

नरोडे खाली कोसळताच मारेकऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, गोळी झाडल्याचा मोठा आवाज आला. तो ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले. त्यांना नरोडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनास्थळावरच नरोडे यांचा मृत्यू झाला.

वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप शिंदे यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. रात्री उशिरा पोलिस उपायुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे व पोलिस उपायुक्त महेंद्र देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली.

खून करणारे दोघे?

नरोडे यांचा शेगडी बनविण्याचा उद्योग आहे. पण, महिनाभरापासून तो बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मिळून हा खून केल्याचा संशय आहे. घटनेच्या वेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झालेला होता.

त्यामुळे मारेकरी कोण आहेत, ते कोणत्या दिशेने पळाले, हे कळाले नाही. दरम्यान, श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, धुळे-सोलापूर मार्गापर्यंत जाऊन श्वान घुटमळले. नरोडे यांना आलेल्या फोन कॉलच्या मदतीने पोलिस खुन्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT