छत्रपती संभाजीनगर

पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याचा संकल्प

CD
पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्याचा संकल्प --------------- गावोगावी होणार जलसंधारणाची कामे; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १३ ः पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते गावातच अडवून जमिनीत मुरविण्यासाठी राज्य शासनाने व्यापक जलसंधारण कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार केले जाणार आहेत. यासोबतच जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलसाठ्यांतील गाळ उपसा, नाल्यांचे खोलीकरण, पर्जन्यजल संचयनाच्या कामांना गती दिली जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातही गावपातळीवर जलसंधारणाच्या कामांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मृद व जलसंधारण विभागाने २६ ऑक्टोबरला यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसंधारण संरचनांची क्षमता पूर्ववत करणे आणि आगामी पावसाचे पाणी साठविण्यासाठी आतापासून तयारी करण्यावर या निर्णयात भर देण्यात आला आहे. विभागाच्या प्रगतिपथावरील तसेच अपूर्ण कामांनाही प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक भूस्तर आणि तांत्रिक निकषांनुसार या खड्ड्यांची जागा व रचना ठरविली जाणार आहे. यामुळे भूजल पुनर्भरणाला मदत होऊन विहिरी आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी सुधारण्यास हातभार लागू शकतो. नादुरुस्त कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती, गेट व फळ्या बसविणे, नीडलची व्यवस्था करणे, जलसाठ्यांमधील गाळ काढणे तसेच नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. वनराई बंधारे उभारण्यावरही भर राहणार आहे. --- विविध निधीतून कामांना बळ जलयुक्त शिवार अभियान २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जिल्हा नियोजन निधी, खनिज विकास निधी, आमदार-खासदार निधी, सीएसआर, रोजगार हमी योजनेतून ही कामे करता येणार आहेत. शासकीय व खासगी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना उभारण्याचाही निर्णयात समावेश आहे. पावसाचे पाणी गावातच अडवून जमिनीत मुरविण्यासाठी योग्य नियोजन आणि ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या कामांमुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळू शकते, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसमोर नवे संकट; बाजारात पाचशे ते साडे पाचशे कमी दराने कापसाची विक्री

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT