Water Tanker
Water Tanker Esakal
छत्रपती संभाजीनगर

Water Issue : सामान्यांची होरपळ, टँकर लॉबीची चंगळ

शेखलाल शेख

छत्रपती संभाजीनगर - शहरातील कृत्रिम पाणी टंचाई आणि राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने मागील काही वर्षांत टँकर लॉबी गब्बर झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश भागात बोअरचे पाणी आटलेले असते. अनेक भागांत आठ दिवस, पंधरा दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, त्यासाठी त्यांना दरवर्षी पाण्यासारखा पैसा मोजावा लागतो. उन्हाळ्यात तर पैसे देऊनही पाणी मिळणे अवघड होते.

पाण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च

शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी दर महिन्याला ७३२ रुपये भरावे लगतात. वर्षाला आठ ते दहा हजार रुपये भरून चार दिवसाआड ४०० लिटर टँकरने पाणी मिळते. नक्षत्रवाडी, कोटला कॉलनी, सिडको एन-५ आणि सिडको एन-७ येथील जलकुंभांवरून नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जाते.

महापालिकेच्या नोंदणीनुसार सध्या शहरात ९२ टँकरद्वारे साडेपाचशे फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गुंठेवारी तसेच शहराच्या परिसरात नळच नसल्याने नागरिकांना टँकरमुळे आठ ते दहा हजार रुपयांचा फटका बसत आहे. काही ठिकाणी तर यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. सध्या शहरात दोन हजार लिटरचा टँकर ४०० ते ४५० रुपयांना मिळत आहे.

टँकर चालक ज्या विहीर, बोअर मालकाकडून पाणी खरेदी करतो त्याला १०० रुपये द्यावे लागतात. ५ हजार लिटरचा टँकर ७०० ते ८०० रुपयांना मिळत आहे. विहीर, बोअर मालकाला २०० त्यातून रुपये दिले जातात. शहरात बीडबायपास, उस्मानपुरा, गारखेडा, रेल्वे स्टेशन परिसर, हर्सूल अशा विविध भागातील विहरी आणि बोअरमधून टँकर भरून ते पाणी शहरात विक्री केले जाते.

पाण्याचा धंदा वाढतोय वेगाने

पाण्याच्या टाक्यांवर महापालिकेचे टँकर भरल्यानंतर ते कुठे जातात, त्यावर नंबर आहे का हे तपासण्याची तसदी महापालिकेचे अधिकारी घेत नाहीत. महापालिकेच्या पाण्याचा किती काळाबाजार होतो याकडे डोळेझाक केली जाते. महापालिका शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात असमर्थ ठरली आहे.

परिणामी मागील काही वर्षात पाण्याचा धंदा प्रचंड वेगाने वाढला आहे. उन्हाळ्यात तर पाण्यातून पाण्यासारखा पैसा कमावला जातोय. शहरातील हॉटेल, हॉस्पिटल, विविध कार्यालये, मोठी घरे, बांधकाम यासाठी टँकरशिवाय पर्याय राहत नाही.

आशीर्वाद कुणाचा?

शहर परिसरातील अनेक वसाहतीत नळच नसल्याने त्यांच्यासमोर टँकरशिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे महापालिकेकडून गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. घरासमोर ठेवलेल्या ड्रममध्ये टँकरने पाणी दिले जाते. मात्र, यातील बरेचसे पाणी अनेक ठिकाणी मुरते. शहरवासियांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या टँकर लॉबीला कुणाचा आशीर्वाद आहे?

शहरातील जलकुंभावरून दररोज किती टँकर भरले जातात? नंबर प्लेटशिवाय हे टँकर पाणी भरून कसे नेतात? यात महापालिकेचे किती टँकर आहेत तसेच खासगी टँकर किती भरले जातात याची पारदर्शकपणे नोंद होण्याची गरज आहे.तथापि, तसेच होताना दिसत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT