Women
Women  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : महिलादिनीच रणरागिणींचा दारूविरुद्ध एल्गार

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : गावात सुरू झालेली अवैध गावरान आणि देशी, विदेशी दारूची विक्री बंद करण्यासाठी जागतिक महिलादिनी बहुलखेडा (ता.सोयगाव) येथे रणरागिणी एकवटल्या होत्या. पोलिस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप या रणरागिणीनी केला असून वरिष्ठांनी दखल घेऊन येथील अवैध दारू विक्रीविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी केली असून दखल न घेतल्यास पोलिस मुख्यालयावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बहुलखेडा येथील हातभट्टीची गावरान, देशी आणि विदेशी मद्याची विक्री पाच महिन्यापूर्वी महिलांनीच आंदोलन करून बंद केली होती. परंतु बंद झालेली अवैध दारूविक्री अचानक सुरु झाल्याने बहुलखेडा येथील रणरागिणी जागतिक महिलादिनी आक्रमक झाल्या होत्या. या महिलांनी एकजूट होऊन गावात आंदोलन केले.

तब्बल दहा तास बहुलखेड्यातील रणरागिणी आंदोलनात होत्या. परंतु तरीही या महिलांच्या आंदोलनाकडे प्रशासनाच्या कोणत्याही विभागाने लक्ष दिले नसल्याने महिलांनी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला.

अखेरीस गावातील मेघराज राठोड यांनीच सायंकाळी मध्यस्थी केली. तसेच याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. यानंतर जागतिक महिलादिनी महिलांनी गावातील अवैध दारूविक्री विरोधात एकवटून ऐन सणासुदीच्या तोंडावर गावातील दारू बंद करण्यासाठी आंदोलन केल्याने या आंदोलनाची चर्चा जिल्हाभर सुरु होती. या आंदोलनात ग्यारसीबाई पवार, कमलबाई चव्हाण, शेटानीबाई पवार, बंसीबाई राठोड, न्यालोबाई जाधव, मीराबाई राठोड, मीराबाई जाधव, कलाबाई जाधव, अनिताबाई राठोड, सोदारीबाई राठोड, सविताबाई जाधव, धृपाताबाई राठोड, अनिताबाई चव्हाण, ललिताबाई चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

पोलिस लक्ष घालतील का

बहुलखेडा येथे पाच महिन्यापूर्वी सोयगाव पोलिसांनी या महिलांना दारूबंदी साठी योग्य सहकार्य केले होते. परंतु पुन्हा दारू विक्री फोफावली असल्याने पोलिस पुन्हा महिलांच्या बाजूने लक्ष घालतील का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT