World TB Day 2021 
छत्रपती संभाजीनगर

World Tuberculosis day 2021: दररोज सुमारे 4 हजार जण  क्षयरोगामुळे गमावतात जीव

मनोज साखरे

औरंगाबाद: जगात दररोज चार हजार नागरिक क्षयरोगामुळे जीव गमावतात व जवळपास २८ हजार लोक या रोगाने आजारी पडतात. टीबीचा सामना करण्यासाठी २००० पासून आतापर्यंत झालेल्या प्रयत्नांत सुमारे ६३ दशलक्ष लोकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. क्षयरोग (ट्युबरक्‍युलोसिस) कोणत्याही वयात, कोणालाही होऊ शकतो; पण सहा महिने योग्य औषधोपचार घेतल्यास रुग्ण रोगमुक्तही होतो. क्षयरोग दूर करण्यासाठी व जनजागृतीसाठी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग (टीबी) दिन साजरा केला जातो. यंदाची ‘थीम’ ‘द क्लॉक इज टिकिंग’ ही आहे.

रुग्णांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला ताप, भूक न लागणे असे क्षयरोगाचे लक्षण आहे. रुग्णांनी तत्काळ क्षयरोगाची तपासणी करून घ्यावी. घाबरण्यासारखे काहीही नाही. उपचाराने क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. फक्त लवकर निदान करून पूर्ण औषधोपचार घ्यायला हवे, असा सल्ला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिला.

मेल्ट्रॉनमधील ५० टक्के खाटा आता घाटीतील रुग्णांसाठीच, औरंगाबाद महापालिकेचा...

ही आहेत लक्षणे -
- बेडकायुक्त खोकला ः दोन आठवडे किंवा जास्त दिवस 
- हलकासा; परंतु संध्याकाळी वाढणारा ताप 
- वजन घटणे, भूक मंदावणे 
- मानेवर गाठी येणे 
- काही गंभीर क्षयरुग्णांच्या बेडक्‍यातून रक्त पडते 
- दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास त्या रुग्णाला संशयित क्षयरोगी समजावे आणि त्या व्यक्तीला छाती-लक्षणे असणारा रुग्ण (चेस्ट सिम्प्टोमॅटिक) म्हणावे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT